मोठी कारवाई! प्राण्यांच्या कातड्यासह दुर्मीळ चित्रांचीही जेएनपीटीतून तस्करी; ३८ चित्रे लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट यांची

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:29 AM2022-11-09T07:29:51+5:302022-11-09T07:30:19+5:30

एका दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत तीन कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिन टन नेकट्रराईन आढळले होते

Even rare paintings including animal skins were smuggled through JNPT | मोठी कारवाई! प्राण्यांच्या कातड्यासह दुर्मीळ चित्रांचीही जेएनपीटीतून तस्करी; ३८ चित्रे लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट यांची

मोठी कारवाई! प्राण्यांच्या कातड्यासह दुर्मीळ चित्रांचीही जेएनपीटीतून तस्करी; ३८ चित्रे लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट यांची

Next

नवी मुंबई :

येथील जेएनपीटी बंदरातील तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणी मोहिमेत तीन कोटींच्या ३२ मेट्रिन टन नेकट्रराईनसह मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह अघोषित मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या प्रमुख चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे जप्त केली आहेत.

एका दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत तीन कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिन टन नेकट्रराईन आढळले होते, तर मंगळवारी गुप्त माहितीनंतर घरगुती वस्तूंच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून मागविलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली.

३८ चित्रे लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट यांची, ३२ मेट्रिन टन नेकट्रराईनही जप्त

झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या प्रमुख चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे जप्त केल्याची माहिती न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने दिली,

Web Title: Even rare paintings including animal skins were smuggled through JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.