शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: October 11, 2015 00:58 IST

कोपरखैरणेमध्ये माथाडी कामगारांना मंजूर केलेल्या घरांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सुरुवातीला या जागेवर छोटेसे मंदिर उभारले होते. सद्य:स्थितीमध्ये फेरीवाल्यांनीही बस्तान मांडले

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुुंबईकोपरखैरणेमध्ये माथाडी कामगारांना मंजूर केलेल्या घरांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सुरुवातीला या जागेवर छोटेसे मंदिर उभारले होते. सद्य:स्थितीमध्ये फेरीवाल्यांनीही बस्तान मांडले असून, कामगार व माथाडी संघटनेने तक्रार करूनही सिडको प्रशासनाने वर्षभरात काहीही कारवाई केलेली नाही. सिडकोने कष्टकरी माथाडी कामगारांसाठी नेरूळ, तुर्भे, वाशी, ऐरोली, घणसोली व कोपरखैरणेमध्ये अल्पदरामध्ये घरे उपलब्ध करून दिली आहेत. १९९५ ते सन २००० दरम्यान जवळपास अडीच हजार घरे बोगस संस्थेला दिली होती. माथाडी संघटनेचे नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी पाठपुरावा करून या घरांचे वाटप थांबविले होते. त्यानंतर जवळपास १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या घरांचे सिडकोने कामगारांना वाटप सुरू केले. सेक्टर १ मधील घर क्रमांक ५३ शैलेश भोसले व ५४ हे भिवा उंबरकर यांना मंजूर करण्यात आले होते. घर मिळाल्यामुळे कामगारांना आनंद झाला. परंतु प्रत्यक्षात मंजूर केलेल्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी झाड असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही कामगारांनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनला याविषयी माहिती दिली. संघटनेने आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१४ ला सिडको प्रशासनाला पत्र देऊन वृक्ष हटविण्याची मागणी केली होती. परंतु सिडको प्रशसनाने वृक्ष वेळेवर हटविले नाहीत. काही महिन्यांनंतर येथील वृक्षाखाली हनुमानाची मूर्ती बसविण्यात आली. अचानक मूर्ती बसविण्यात आल्यामुळे कामगारांना आपल्याला घरापासून वंचित राहावे लागण्याची भीती वाटू लागली आहे. यापूर्वी सदर ठिकाणी असलेली देवाची मूर्ती बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु याविषयी काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मूर्ती पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. जवळपास वर्षभरापासून या ठिकाणचे अतिक्रमण वाढत गेले आहे. या भूखंडावर पत्र्याचे शेड उभे करण्यात आले आहे. या शेडमध्ये भाजी, हार, फुले व इतर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाकडेही सिडको व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हमालीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन कामगारांना घरापासून वंचित राहावे लागत असून, हा अन्याय दूर करावा अशी मागणी कामगार व त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. सिडकोेने येथील अतिक्रमण दूर करावे किंवा कामगारांना तत्काळ पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याची मागणीही केली जात आहे.सिडकोच्यावतीने मला ५३ क्रमांकाचे घर मंजूर केले होते. परंतु सदर ठिकाणी अतिक्रमण झाले असल्यामुळे गत वर्षभरापासून त्याचा ताबा मिळू शकलेला नाही. सिडको व महापालिका प्रशासनाने योग्य कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा. - शैलेश भोसले, माथाडी कामगारघरे मंजूर झाली, परंतु ती ताब्यात मिळाले नाहीत. वर्षभर आम्ही हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहोत. परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही. आम्हाला मंजूर केलेल्या जागेवरील अतिक्रमण दूर करावे किंवा तत्काळ पर्यायी घरे मिळवून द्यावीत. - भिवा उंबरकर, माथाडी कामगार