शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाड्यात बायोगॅससह होणार वीजनिर्मिती

By admin | Updated: March 22, 2017 01:40 IST

महापालिका चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये बायोगॅससह वीजनिर्मिती प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ७० लाख रुपये खासदार निधी

नवी मुंबई : महापालिका चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये बायोगॅससह वीजनिर्मिती प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ७० लाख रुपये खासदार निधी व तब्बल ६२ लाख रुपये लोकसहभागातून उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारे उपक्रम राबविणारी नवी मुंबई पहिलीच पालिका ठरणार आहे. स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये प्रत्येक घरामध्ये वैयक्तिक शौचालय उभारण्यात येत आहे. शौचालय उभारण्यासाठी शासन अनुदान देत असून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रभाग ७ चिंचपाडामध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. वैयक्तिक शौचालयामधून निघणाऱ्या मैल्यावर प्रक्रिया करून बायोगॅस प्रकल्प व त्या माध्यमातून वीजनिर्मिती करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास १ कोटी ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील ७० लाख रुपये ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या निधीमधून खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित ६२ लाख ६३ हजार रुपये स्वर्गीय नगरसेविका मीनाताई विजय चौगुले रहिवासी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी २५ हजार लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. ग्रे वॉटर टँक बांधणी, पाण्यासाठी टाकी बांधणे, अ‍ॅनारोबिक डायजेस्टर बांधणे, फिड हँडलिंग रूम बांधणे, बलून रूम बांधणे, इंजिन रूम बांधण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावित बायोगॅस प्रकल्पातून ४०० एम३ एवढा बायोगॅस व ५०० केएचडब्ल्यू एवढी वीजनिर्मिती होणार आहे. या विजेचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जाणार आहे. बायोगॅस युनिटच्या स्थापत्यविषयक कामे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मलनि:सारण केंद्र उभारली आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करणारी ही पहिली महापालिका असून आता घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्या वापरातून सामूहिक बायोगॅस युनिट उभारणारी ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)