शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकातील बंद इंडिकेटरमुळे प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: June 30, 2017 03:06 IST

प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा मात्र आता त्रासदायक ठरत आहे. नवी मुंबईमधील परिसरातील बेलापूर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा मात्र आता त्रासदायक ठरत आहे. नवी मुंबईमधील परिसरातील बेलापूर, सीवुड्स, नेरुळ, जुईनगर, सानपाडा आदी रेल्वे स्थानकांतील लोकलची वेळ दर्शविणारे इंडिकेटर ऐन पावसाळ््यात बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत असून देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. घड्याळाच्या काट्यांवर चालणाऱ्या नोकरदारवर्गाला रेल्वे स्थानकात वेळेबाबत तसेच लोकलविषयीचा सूचनाच कळत नसल्याची तक्र ार प्रवाशांनी केली आहे. स्थानकातील सध्याची वेळ तसेच लोकलची वेळ दाखविणारे इंडिकेटर अकार्यक्षम असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नादुरुस्त इंडिकेटरमुळे फलाटावर आलेली लोकल नेमकी कुठली आहे यासाठी कसरत करावी लागते. या मार्गावरून रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार महिलांनी लोकलच्या मार्गाची खात्री करण्यासाठी जीव धोक्यात घालून फलाटावर प्रवेश करणाऱ्या लोकलवर लिहिलेला मार्ग पाहवा लागतो. अनेकदा रेल्वेचा मार्ग न कळाल्याने पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना सीएसटी-बेलापूर या लोकलमध्ये चढत असल्याने पुन्हा फलाटावरून उतरून बेलापूर-पनवेल लोकल गाठावी लागते. उद्घोषणेच्या नावानेही बोंबाबोब असल्याने नवीन प्रवाशांना गोंधळून टाकते. या नादुरु स्त इंडिकेटरकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते त्यामुळे सीएसटी-पनवेल तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.