“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:53 IST2025-10-08T16:49:48+5:302025-10-08T16:53:03+5:30
Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान मोदींचे हात देणारे आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान मोदींचे हात देणारे आहेत. काँग्रेस आघाडीसारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाही. काँग्रेसचे करप्शन फर्स्ट आणि मोदी यांचे नेशन फर्स्ट हा फरक आहे. मोदी हे विकासाची आंधी आहेत, असे कौतुकोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योजक गौतम अदानी यांच्यासह अनेक मंत्री, नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आपण करतो. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले होते, त्याचे आज लोकार्पण होते आहे. मोदींचा हात लागतो त्या गोष्टीचे सोने होते हे आपण पाहतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
२०१४ पंतप्रधान मोदी यांनी भारताला महासत्ता करण्यासाठी टेक ऑफ केले
२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी टेक ऑफ केले, ते भारताला महासत्ता करण्यासाठी आहे. प्रगती आणि विकास याबरोबरच येतात. उड्डाण म्हटले की आम्हाला मोदी आठवतात. मी आज आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो की, या एअरपोर्टची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी केली जात आहेत. पण लवकरच लंडनचे लोक हिथ्रोची तुलना नवी मुंबईशी करतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाविकास आघाडीने समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इतर सगळ्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर लावले होते. पण २०२२ सगळे स्पीडब्रेकर उखडून टाकले. त्यानंतर राज्याचा विकास होतो आहे. २०१४ पर्यंत काँग्रेसने महाराष्ट्राच्या फक्त २ लाख कोटी दिले होते मात्र मागच्या दहा वर्षांत मोदींनी १० लाख कोटींचा निधी महाराष्ट्राला दिला. आज आपला शेतकरी म्हणजेच बळीराजा संकटात आहे. या पूरग्रस्तांसाठी आपल्या सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केला. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा शब्द आम्ही पाळला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.