गर्भवतीच्या उपचारात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:28 AM2018-03-30T02:28:48+5:302018-03-30T02:28:48+5:30

घणसोली येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेची पुरेशा पैशाअभावी फरफट चालू आहे.

Delay in the treatment of pregnancy | गर्भवतीच्या उपचारात दिरंगाई

गर्भवतीच्या उपचारात दिरंगाई

Next

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेची पुरेशा पैशाअभावी फरफट चालू आहे.
शीतल धेंडे या आठ महिन्यांच्या गर्भवती असून, त्यांना सिझर करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. मात्र, वाशीच्या मनपा आणि नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता शिशू विभागात जागा नाही, तसेच ऐरोली व नेरुळमधील रु ग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू नसल्याने या गर्भवती महिलेची फरफट होत आहे. सिझर झाल्यानंतर कमीत कमी एक महिना बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे असल्याने खासगी रुग्णालयाचा लाखो रुपयांचा खर्च पेलवण्याची ताकद नसल्यामुळे ते दाम्पत्य हादरून गेले आहे.
मनपाची तीन तीन रु ग्णालये असताना नेरु ळ व ऐरोली येथील १०० बेडची रु ग्णालये चार वर्षे पूर्ण होऊनही पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. तसेच ऐरोली येथील रुग्णालयात तर आजतागायत आॅक्सिजन लाइन टाकण्यात टाकण्यात आली नाही. तर वाशी येथील प्रथम संदर्भ रु ग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे कधी चालू तर कधी बंद असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने याची योग्य ती दखल घेऊन गरजू व गरीब लोकांची व्यथा जाणावी, असे धेंडे कुटुंबाला मदत करणाºया गणेश सकपाळ यांनी सांगितले. याबाबत वाशी रुग्णालयाचे अधीक्षक प्रशांत जवादे यांना विचारले असता,शिशू अतिदक्षता विभागातील बेड रिकामे नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महिलेच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Delay in the treatment of pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.