शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराच्या झटक्याने आरोपीचा कोठडीत मृत्यू

By admin | Updated: February 24, 2015 01:12 IST

एका टँकर चालकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कारचालकाला पोलीस

अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार शहराच्या मुख्य २२ रस्त्यांवरील विद्युत खांब हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ३0 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करीत सोमवारी शासनाकडे पाठवला. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर येऊन ठेपली असून, येत्या २६ फेब्रुवारी रोजी मनपा अधिकारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करणे नितांत गरजेचे झाले आहे. खड्डय़ांच्या समस्येला अकोलेकर वैतागले असतानाच मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील विद्युत खांबांमुळे रुंदीकरणाच्या कामाला खीळ बसली आहे. प्रशासनाने डांबरी रस्त्यांची अनेकदा दुरुस्ती केली; परंतु रस्त्यांवर विद्युत खांब कायम असल्याने दुरुस्तीला तसेच वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. सदर विद्युत खांब हटवण्यासाठी मनपाने महावितरणला अनेकदा पत्रव्यवहार केला. त्यावर महावितरणने जानेवारी महिन्यात २२ रस्त्यांवरील विद्युत खांबांचे सर्वेक्षण करीत खांब हटवून जमिनीखालून वीज वाहून नेण्यासाठी २४ कोटींचा खर्च प्रस्तावित केला. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता मनपाला तात्काळ रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करायची आहे. विकासकामे सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील विद्युत खांब हटल्यास मनपाचा मार्ग मोकळा होईल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले असताना हा मुद्दा खासदार संजय धोत्रे,आमदार गोवर्धन शर्मा यांसह विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्यापुढे मांडला होता. यावर विद्युत खांब हटवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देत मनपाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३0 कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला असून, येत्या २६ फेब्रुवारी रोजी प्रस्तावाच्या मुद्दय़ावर मनपा अधिकारी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे.