शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली नाल्याच्या काठावर संस्कृती उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:12 IST

केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत घणसोली नाल्याच्या काठावर हरित क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संस्कृती या संकल्पनेवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत घणसोली नाल्याच्या काठावर हरित क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संस्कृती या संकल्पनेवर आधारित हे उद्यान विकसित केले जाणार असून १ कोटी ५२ लाख रुपयांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली आहे. घणसोली नोड हस्तांतर केल्यानंतर तेथील रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सेक्टर ९ मधील घरोंदा सोसायटीला लागून असलेल्या नैसर्गिक नाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नाल्यातील दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरू लागली होती. परंतु आता हाच नाला या परिसराचे वैभव वाढविणार आहे. नाल्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी असिम गोकर्ण हरवंश यांच्याकडून प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ५० लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्के रक्कम केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासनाच्या अनुदानातून व उरलेली २५ टक्के रक्कम महापालिकेच्या निधीतून खर्च करावयाची आहे. या प्रकल्पाची संस्कृती या संकल्पनेवर आधारित रचना करण्यात आली आहे. शहरातील हरित आच्छादन वाढविण्याचा उद्देश आहे. नाल्याच्या बाजूला बेल, रूद्राक्ष, पंगारा, अशोक, पारिजात, पळस, नारळ, सुपारीचे वृक्ष लावण्यात येणार आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या वेलीही लावण्यात येणार आहे. नागरिकांना फिरता यावे यासाठी पदपथ, बैठक व्यवस्थेसह इतर कामे केली जाणार आहेत. सर्वसाधारण सभेने १ कोटी ५२ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शिवसेनेचे नामदेव भगत यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादीच्या दिव्या गायकवाड यांनी इतर विभागातही अशाप्रकारे ग्रीनबेल्ट विकसित करावे, अशी मागणी केली आहे. घणसोलीत उद्यान नाही. नाल्यालगतचा संपूर्ण भाग हरित पट्टा म्हणून विकसित करण्यात यावा. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ७५ टक्के रक्कम मिळणार आहे. हरित पट्टा विकसित करताना वृक्षांना मलनि:सारण केंद्रातील शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचा वापर करण्यात यावा. - द्वारकानाथ भोईर, गटनेते, शिवसेना