कर्नाळा येथे पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:39 PM2019-12-31T23:39:57+5:302019-12-31T23:40:07+5:30

अभयारण्याला पसंती; वर्षभरात ९८ हजार नागरिकांची भेट

A crowd of tourists at Karnala | कर्नाळा येथे पर्यटकांची गर्दी

कर्नाळा येथे पर्यटकांची गर्दी

Next

- वैभव गायकर 

पनवेल : कर्नाळा अभयारण्य पर्यटकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. वर्षभरात सुमारे ९८ हजार १८५ पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. पर्यटनवाढीसाठी वनविभागाच्या वतीने सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत.

पनवेलपासून सुमारे १२ किमी अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात रानसई चिंचवनच्या जंगलापर्यंत अभयारण्य पसरले आहे. या ठिकाणचा ऐतिहासिक कर्नाळा किल्ला शिवकाळातील आठवणींना उजाळा देतो. याव्यतिरिक्त जंगली प्राणी, विविध प्रजातीचे देशी-विदेशी पक्षी हे पर्यटकांना भुरळ घालत असतात. कर्नाळा अभयारण्यात एकूण १२५पेक्षा जास्त जातीचे पक्षी आढळतात. यात मलबार, व्हिसलिंग, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढºया पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवीआदी पक्षी आढळतात. यामध्ये मध्य आशिया, युरोप, सैबेरियातील स्थलांतरित पक्षीही येतात. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम परिस्थितीकीय विकास समिती स्थापन केली आहे. पर्यटनवाढीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण प्रयत्न करीत आहेत. फुलपाखरू उद्यान पर्यटकांना भुरळ घालत आहे.

कर्नाळा अभयारण्यात विविध प्रजातीच्या पक्ष्यांची रेलचेल असते. मात्र सर्वांनाच सहजरीत्या हे पक्षी पाहावयास मिळत नाहीत.
वेगवेगळ्या आकाराच्या पाच दुर्बीण पर्यटनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. दुर्बिणीच्या क्षमतेनुसार त्या पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

कर्नाळा अभयारण्याची ख्याती जगभरात पोहोचविण्यासाठी लवकरच वेबसाईट सुरू केली जाणार आहे. देशभरासह विदेशातील पर्यटकांना कर्नाळा अभयारण्याची माहिती सहज उपलब्ध व्हावी, तसेच आॅनलाईन बुकिंग करता यावे, यासाठी नवीन वर्षात वेबसाईट सुरूकेली जाणार आहे.
- पी.पी. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

Web Title: A crowd of tourists at Karnala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.