CoronaVirus पनवेलमध्ये आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 21:46 IST2020-03-31T21:45:51+5:302020-03-31T21:46:09+5:30
पनवेल मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली असून एका रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

CoronaVirus पनवेलमध्ये आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
पनवेल :रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे.पनवेल मधील खारघर शहरातील हा रुग्ण आहे.दुबई प्रवासाचा इतिहास असलेला हा व्यक्ती होम कोरंटाईन मध्ये होता .
मंगळवारी या व्यक्तीचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पनवेल मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली असून एका रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.पनवेल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन झाली आहे.अद्यापही शेकडो नागरिक पनवेल मध्ये होम कोरंटाईन मध्ये आहेत.खारघर मधील या रुग्णाचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे.