शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus News : शहरात तोतया संघटनांचा सुळसुळाट; कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:38 PM

मुळात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी अशा बोगस संघटनांवर कारवाईचे आदेश देऊनही त्यांना पाठीशी घातले जात आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, शहरात पुन्हा एकदा तोतया संघटना सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांसह राजकारण्यांना कोविड योद्ध्यांच्या प्रमाणपत्राची खैरात वाटली जात आहे. मुळात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी अशा बोगस संघटनांवर कारवाईचे आदेश देऊनही त्यांना पाठीशी घातले जात आहे.नवी मुंबईसह देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या दरम्यान अनेक जण अडचणीत अडकलेल्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या कार्याची प्रशंसा करून काही तोतया संघटना आपला जम बसवू पाहत आहेत. त्याकरिता कोविड योद्धा प्रमाणपत्रांची खैरात वाटली जात आहे. पोलीस, माजी नगरसेवक, सक्रिय राजकारणी यांना या प्रमाणपत्रांच्या मोहात पाडले जात आहे. मुळात डॉक्टर, सफाई कामगार, अग्निशमन दल, तसेच इतर आपत्कालीन यंत्रणेच्या कामगारांना शासनाने ‘कोविड योद्धा’ असे संबोधले आहे. त्याचाच वापर सरसकट केला जात आहे. त्यात काही संघटनांची सूत्रे बिहारमधून हालत असल्याचेही समोर आले आहे. त्यात काही तोतया पत्रकार व त्यांच्या संघटनांचादेखील भर पडला आहे.त्यांच्याकडून पोलीस व राजकीय व्यक्तींच्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ज्यांच्याकडून लॉकडाऊन दरम्यान कोणालाही मदत केल्याचे फोटो दिसल्यास त्यांना संपर्क साधून हितसंबंध जोपासत ‘कोविड योद्धा’ प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षातले कोविड योद्धे समाजाच्या नजरेआड जात असून, भलत्याच व्यक्ती कोविड योद्धे म्हणून सन्मान मिळवत आहेत, परंतु पोलीस ठाण्यातही अशा बोगस संघटनांचे पदाधिकारी सर्रासपणे वावरत असतानाही कारवाई होत नसल्याने पोलीस त्यांच्या मोहात पडल्याचे दिसून येत आहे.मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन या शासनाच्या संस्था असल्याने त्याच नावाचा वापर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तोतया संघटना सक्रिय आहेत. त्यांच्याकडून गैरप्रकार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २०१८ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल तत्कालीन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतली होती. राज्यभराची अशा तोतया संघटनांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या होत्या. या दरम्यान पनवेलमधून व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाºया अशाच बोगस संघटनेच्या टोळीला अटक केली होती. त्यानंतर मात्र शहरातून काही प्रमाणात बोगस संघटनांच्या उघड हालचालींना आळा बसला होता, परंतु कोरोनामुळे अशा संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस