शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

coronavirus: नवी मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी दिशाभूल करणारी, पाच जणांचीही होत नाही चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:24 AM

coronavirus: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगविषयी आकडेवारी दिशाभूल करणारी ठरत असून, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.नवी मुंबईमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व विषाणू प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला विशेष महत्त्व आहे. पालिका कार्यक्षेत्रात रुग्णाच्या संपर्कातील किमान २५ जणांची चाचणी केली जात असून, हे प्रमाण ३० वर घेऊन जाण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याचे कागदावर भासविले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच व्यक्तींचाही शोध घेतला जात नाही. अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाच्या संपर्कात आले आहेत, हे विचारलेही जात नाही. काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी विचारतात; परंतु रुग्ण माहिती देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. संपर्कातील व्यक्तींची माहिती दिली जात नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई