शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:43 IST

कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत.

- सुर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोविड रुग्णांवर उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या समोर येत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी रुग्णालयात अथवा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन आल्यानंतर, पुढील पाच ते दहा दिवसांत त्यांच्यातही लक्षणे आढळून येत आहेत. ज्यांना यापूर्वी प्रकृतीच्या समस्या नव्हत्या, त्यांनाही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यात भीती वाटणे, अपचन व मानसिक तणाव या समस्या प्रामुख्याने आढळून येत आहेत. यामुळे कोरोनावर मात करून आल्यानंतरही त्यांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. समोर येत असलेली लक्षणे कोरोनाचीच आहे की सामान्य, याचा उलगडा सहज करणे डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे अशा कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दिसणाºया लक्षणांवर उपचार काय करायचे, असाही प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. एखाद्या रुग्णाला दाखल करून घ्यायचे झाल्यास, त्याकडे संशयित कोरोना रुग्ण म्हणूनच पाहून स्वतंत्र उपचार यंत्रणा उभारावी लागत आहे. परिणामी, कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेक जण इतर दुखण्यांमुळे खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत.सद्यस्थितीला पालिकेचे साधारण रुग्णालय बंद असून, केवळ कोविड सेंटर चालविण्यावर जोर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरल्या जात असलेल्या गोळ्यांनी अनेकांमध्ये प्रचंड अशक्तपणा निर्माण होत आहे. तर दहा दिवसांनी सदर रुग्णाला घरी सोडताना पुढील काही दिवस अशक्तपणा राहणार असून, भीती वाटल्यासारखे होईल, याचीही कल्पना दिली जात आहे, परंतु उपचारासाठी वापरल्या जाणाºया गोळ्यांनी पचनप्रक्रिया बिघडत असल्याने अशक्तपणा वाढत आहे. अशातच श्वास अडकणे, हृदयात धडकी भरणे अशी समस्या समोर येऊ लागल्याने भयभीत होणाºया कोरोनामुक्त रुग्णांना नाइलाजास्तव पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.कोरोनावरील उपचारानंतर त्यांना भेडसावणाºया समस्या कोरोनामुळे की उपचारामुळे निर्माण होत आहेत, याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम अवस्था आहे. इतर आजारांमध्ये उपचारानंतरही पुढील काही दिवस त्यांची चौकशी केली जाते. मात्र, कोरोनाच्या बाबतीत एकदा उपचार केल्यानंतर पुन्हा फॉलोअप घेतला जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सध्या पालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला दहा दिवसांनी फोन करून केवळ चौकशी करण्याचे काम होत आहे. कोरोनानंतर समोर येणाºया इतर समस्यांवरही उपचारासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोरोनातून मुक्त झालेले अनेक जण आरोग्याच्या विविध समस्या घेऊन येत आहेत. इतर आजारांवर ज्याप्रकारे उपचारात फॉलोअप घेतला जातो, तसा कोरोना रुग्णांवर घेतला जाणे आवश्यक आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वीच तत्कालीन आयुक्तांना कळवण्यात आले होते. विद्यमान आयुक्तांनाही संघटनेमार्फत तसे कळवले जाणार आहे.- डॉ. प्रतीक तांबे,हिम्पाम, महाराष्ट्र सहसचिव तथा,नवी मुंबईचे अध्यक्षकोरोनाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने भीती आहे. अशातच उपचारानंतर येणार अशक्तपणा व उद्भवणाºया इतर समस्या याचा परिणाम मानसिकतेवर उमटत आहे. यामुळे सतत भीती वाटणे, मानसिक संतुलन हरपणे अशा समस्यांचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यांना उपचारासह धीर देण्याची गरज आहे.- डॉ.अंजली पाटील,मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई