Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:19 AM2021-03-22T00:19:16+5:302021-03-22T00:19:34+5:30

पनवेलच्या खासगी रुग्णालयात कोरोना लसींचा कृत्रिम तुटवडा? दिलेल्या लसी पालिकेने घेतल्या परत, पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न   

Corona Vaccination: Vaccination is not interfered with by corporators or people's representatives, is it? | Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना?

Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना?

Next

पनवेल : लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून लाभार्थींना लस मिळण्यास वेगवेगळे अडथळे निर्माण होत आहेत. शासनाकडून पालिकांना या लसींचा पुरवठा केला जात आहे. मात्र पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वारंवार लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयात ही समस्या उदभवत असून, पालिका क्षेत्रात निर्माण झालेला लसींचा तुटवडा कृत्रिम तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१ मार्चपासून ११ खासगी रुग्णालय व सहा प्राथमिक नागरी केंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. मात्र सुरुवातीला ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने लसीकरण थांबविण्यात आले होते. त्यानंतर वारंवार ठिकठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून, खासगी रुग्णालयातून ज्येष्ठांना वारंवार रिकाम्या हाती परतावे लागत आहे. १९ मार्चला खासगी रुग्णालयांना दिलेला कोविड लसींचा पुरवठा पालिकेने खासगी रुग्णालयाकडून परत घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून खासगी रुग्णालयात लस घेण्याचा कल असल्याने अशाप्रकारे खासगी रुग्णालयातून लसी परत घेतल्या गेल्याने खासगी रुग्णालयात नाव नोंदविलेल्या लाभार्थींची मोठी गैरसोय होत आहे. पालिकेच्या केंद्रात लसीकरण सुरळीत सुरू असल्याने लसीकरणात राजकीय हस्तक्षेप तर केला जात नाही ना, असा प्रश्न उद‌्भवला आहे. कारण  बहुतांश नगरसेवक आपल्या जनसंपर्क कार्यालयातून लसीकरणासाठीची प्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात बोलावून पूर्ण करीत आहेत. 

याकरिता लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी शासकीय केंद्रात ने-आण करायची जबाबदारी नगरसेवक पाडत आहेत. अशा परिस्थितीत पालिकेच्या केंद्रात लसींकरण सुरळीत असेल व खासगी रुग्णालयात लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असेल तर यामागे राजकीय हस्तक्षेप नाही ना, याबाबतदेखील प्रश्न निर्माण झाला आहे. २१ मार्चपर्यंत ३६ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी लसीकरणाचा अनेकांचा विचार असतो; मात्र गेल्या शनिवार, रविवार  लस संपुष्टात आल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक जण खासगी रुग्णालयात लसीकरणाला पसंती देत असतात; मात्र खासगी रुग्णालयात नोंदणी केलेल्यांना लसींचा पुरवठ्याअभावी वाट बघावी लागत आहे. 

लसीकरणात राजकीय हस्तक्षेप?
नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण लोकप्रतिनिधींमार्फत केलेल्या नोंदणीतील लाभार्थींना पालिकेच्या केंद्रात लस मिळत आहे.

लसींचा तुटवडा असल्याचे शासनानेही जाहीर केले आहे. सर्व केंद्रांवर समप्रमाणात लसींचे वाटप केले जात आहे. लसींचा कृत्रिम तुटवड्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Web Title: Corona Vaccination: Vaccination is not interfered with by corporators or people's representatives, is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.