शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दिघी पोर्टला पाणी देण्यास विरोध

By admin | Updated: October 5, 2015 00:34 IST

दिघी पोर्टसह दिघी, कुडगाव, हरवित या गावांसाठी तसेच कुडकी लघुपाटबंधारे गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.

बोर्ली-पंचतन : दिघी पोर्टसह दिघी, कुडगाव, हरवित या गावांसाठी तसेच कुडकी लघुपाटबंधारे गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या योजनेस याआधीही वडवली, कुडकी, गोंडघर, भावे गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासंदर्भात वडवली ग्रामस्थांचा विरोध होवू नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण उपविभाग माणगांव यांच्याकडून वडवली ग्रामपंचायतीला पत्र पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने केले आहे. यावर वडवली, गोंडघर, कुडकी, भावे, शिस्ती येथील ग्रामस्थांची सभा घेण्यात आली. या सभेत दिघी पोर्ट व इतर गावांसाठी कुडकी धरणातून पाणी न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून प्रशासन जर दिघी पोर्टसाठी कुडकी धरणातून पाणी देत असेल तर आम्ही मागे हटणार नाही, वेळ पडल्यास तीव्र आंदोलनही छेडू असा निर्णय सभेत घेण्यात आला आहे.दिघी पोर्ट हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर श्रीवर्धन तालुक्यामध्ये विकसित होत आहे.दिघी गाव, कुडगाव, हरवित या गावांसाठी दिघीपासून सुमारे १२ किमीवरील कुकडी धरणातून नळपाणी पुरवठा योजना मंजूर आहे. त्या योजनेस वडवली, कुडकी, गोंडघर, भावे या गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध यापूर्वीही होता, याआधी या योजनेसाठीची विहीर अक्षरश: धरणामध्येच खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी वडवली येथील काही ग्रामस्थांनी या योजनेला विरोध करीत दोन वर्षापूर्वीच योजनेचे काम बंद पाडले होते. नुकतेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना उपविभाग माणगाव यांच्याकडून वडवली ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ग्रामस्थांचा विरोध होवू नये व योजनेचे काम सुरळीत सुरू व्हावे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आले आहे. कुडकी धरणातून दिघी पोर्ट व तीन गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेस वडवली, कुकडी, गोंडघर, भावे, शिस्ते ग्रामस्थांचा प्रखर विरोध असून प्रसंगी आम्ही तीव्र आंदोलनही छेडू असे वडवली येथे झालेल्या पाच गावांच्या सभेमध्ये एकमुखाने ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)