शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेचा प्रशासनाकडून होतोय अवमान

By admin | Updated: June 30, 2017 03:00 IST

सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव मांडत असतात. प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव मांडत असतात. प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाकडून सभागृहाचा अवमान होत असल्याची खंत शिवसेना नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांनी व्यक्त केली आहे. नेरुळमध्ये सन २०१० ते २०१५मध्ये शिवसेनेचे रतन मांडवे नगरसेवक असताना प्रभाग-७०च्या विकासासाठी किती ठराव मांडले होते व विद्यमान प्रभाग-८७मध्ये किती प्रस्ताव मांडले व त्यामधील किती ठरावांची अंमलबजावणी झाली याविषयी लेखी प्रश्न विचारला होता. पालिका प्रशासनाने २३ ठराव मंजूर झाले असल्याची माहिती दिली आहे. या ठरावांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल सुनीता मांडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदस्यांनी मांडलेले प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केलेले असतानाही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पालिका सदस्यांचा अवमान केला असून याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी विविध प्रस्ताव सादर करत असतात. त्या प्रस्तावांची दखल घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने रतन मांडवे यांनी मांडलेल्या २३ प्रस्तावांची यादीच सादर केली आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी भुयारीमार्ग बांधण्यात यावेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी पालिकेच्या वास्तू व इमारती नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात यावे. सार्वजनिक वाचनालयांची उभारणी करणे. मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यात यावी. मनपा अस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, या प्रस्तावांचा समावेश आहे. प्रभाग ७० नेरुळ सेक्टर-८ येथे बाजार संकुल उभारण्यात यावे. मनपा ग्रंथालय इमारतीच्या शेजारी अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यात यावी. सारसोळे जेटीची पुनर्बांधणी करून हायमास्ट बसविण्यात यावा. साहेबराव शेरे उद्यानात जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे प्रस्ताव मांडले होते. विद्यमान नगरसेविका सुनीता मांडवे यांनीही अनेक प्रस्ताव मांडले आहेत. त्या सर्वांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.