शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

जिओ फोरजी लाईनच्या खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 8:55 PM

खारघर सेक्टर १०मध्ये जिओ फोरजी लाईनचे काम सुरू आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १०मध्ये जिओ फोरजी लाईनचे काम सुरू आहे. खोदकाम करताना येथील तुलसी कमल बिल्डिंगसमोर सिडकोची जलवाहिनी खोदकाम करताना फोडल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे. खोदकाम करताना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला विश्वासात न घेता हे खोदकाम केल्याने हा प्रकार घडला. यावेळी सुमारे तासभर जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर वाहत होते. खारघर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू आहे. येथील रहिवाशांनी मागील महिन्यातच अपुऱ्या पाण्याअभावी  सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता.मात्र बेजबाबदारपणे खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने याचा परिणाम सेक्टर १० मधील पाणीपुरवठ्यावर झाल्याने संध्याकाळी येथील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे तुलसी कमल बिल्डिंगमधील रहिवासी सुरेश ठाकूर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांनी केली आहे.घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुमित मोरवाल यांनी घटनास्थळी पाहणी केली. संबंधित बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कंत्राटदावर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकार घडल्यावर खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी गजानन दलाल यांना विचारणा केली असता संबंधित काम स्थगित ठेवण्याचे आदेश जिओ फोरजीच्या कंत्राटदाराला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.