शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

सिडकोत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशबंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:25 AM

CIDCO : सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा सिडको कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

 नवी मुंबई : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशबंदी केली आहे. त्यानुसार सिडकोनेसुद्धा निर्देश जारी केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा सिडको कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडकोने त्यासाठी ई-व्हिजिटर्स प्रणालीचा अवलंब केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी  सांगितले. सिडकोच्या सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयात अभ्यागतांची नेहमीच गर्दी असते. विविध कामांनिमित्त येणाऱ्या सामान्य नागरिकांसह ठेकेदार, कंत्राटदार, राजकीय नेते आदींचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्याशिवाय सिडकोच्या नोडल कार्यालयातसुद्धा नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ४ एप्रिलपासून मिशन ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ५ एप्रिलपासून शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयातील गर्दीला आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध कामांनिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आता मज्जाव करण्यात आला आहे. हे करीत असताना कोणतेही काम रेंगाळू नये, त्यासाठीसुद्धा पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सिडकोनेसुद्धा या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सिडकोच्या सर्व कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर विस्तृत माहिती- नागरिकांची कामे रखडू नयेत, त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यादृष्टीने सिडकोने ई-व्हिजिटर्सप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीबाबत सिडकोच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित विभाग प्रमुखांना भेटण्यासाठी इतर व्हर्च्युअल प्रणालींचासुद्धा अवलंब करता येणार आहे. हा नियम सर्व घटकांना लागू आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस