शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सिडकोचा गृहप्रकल्प : ९५ टक्के कागदपत्रांची पडताळणी झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:51 AM

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे.

नवी मुंबई  -  सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत जवळपास ९५ टक्के अर्जदारांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे.सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांसाठी सोडतील यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अ‍ॅक्सिस बँकेच्या संबंधित शाखांत जमा करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्च महिन्यात निवारा हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ई-मेल, फोन तसेच एसएमएसद्वारे वेळ दिली जाते.दरम्यान, मागील दोन महिन्यांत या योजनेला अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार एकूण यशस्वी ठरलेल्यांपैकी सुमारे ९५ टक्के अर्जदारांनी या योजनेअंतर्गत आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे. सध्या ७०० ते ८०० अर्जांची पडताळणी शिल्लक आहे. १५ मेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठीची अंतिम मुदत आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोHomeघर