शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसाठी सिडकोची चाचपणी

By admin | Updated: September 7, 2015 04:07 IST

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्यास आणखी

नवी मुंबई: सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्यास आणखी दीड दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यापूर्वीच सिडकोने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राईट्स लिमिटेड या खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलापूर ते खांदेश्वर दरम्यान २३.४ किमी लांबीचा हा प्रकल्प असून तो तीन टप्प्यात पूर्ण करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार सीबीडी ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु विविध कारणांमुळे रखडलेला हा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २0१७ साल उजाडण्याची शक्यता आहे. असे असले तरी सिडकोने पुढील तळोजा (एमआयडीसी) ते खांदेश्वर आणि तळोजा एमआयडीसी ते पेंधर या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांचीही कार्यवाही सुरू केली आहे.या दोन्ही टप्प्यांचा विस्तृत कार्यअहवाल तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कार्यअहवाल तयार करण्याची जबाबदारी राईट्स लिमिटेड या खासगी कंपनीवर सोपविण्याचा निर्णय झाल्याचे समजते. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. काही ठिकाणी भौगालिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राईट्स या संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या संस्थेकडून विस्तृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढच्या वर्षी दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी निविदा काढण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते. (प्रतिनिधी)