शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Updated: July 8, 2017 06:00 IST

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पाच साथीदारांना यापूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेली आहे. या टोळीने १७ जणांची फसवणूक करून तीन कोटी रुपयांचा अपहार केला आहे.एमबीबीएसकरिता प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन, लाखो रुपये जमा करून, त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार गतवर्षी सानपाडा येथे घडला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. अभिषेक झा, सौरभ सिंग, गौरव सिंग, सुशीलकुमार वर्मा व हेमंत सरकार अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात त्यांच्या इतरही साथीदारांचा सहभाग असल्यामुळे पोलीस त्यांचाही शोध घेत होते. यानुसार इतर दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. ॠ षीकेश सिंग उर्फ मुकेश भगत (३१) व अतिरेक सिन्हा उर्फ राहुल सावन (२९), अशी त्यांची नावे आहेत. दोघेही बंगळुरू येथे बनावट नावाने राहत होते. याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-एकच्या पथकाला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस नाईक अजय मोरे, अशोक कंखरे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी बंगळुरू येथे छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांनी स्वत:ची बनावट नावाने कागदपत्रेही तयार केली होती. त्यांच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने सानपाडा येथे ‘द एस्पिरेशन’ नावाने कार्यालय सुरू करून नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना फोनवर संपर्क साधून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यापैकी काहींना कार्यालयात बोलावून धनादेश अथवा रोख स्वरूपात १७ जणांकडून एकून तीन कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी कार्यालय बंद करून पळ काढल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता.