शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:55 IST

रेल्वे-सिडको प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : रेल्वे सिडको प्रशासनाविरोधात कोटगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सहाव्या दिवशी सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नीलेश भोईर यांनी दिली.भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर उरण नौदलाच्या गोदामापर्यंत रेल्वेने दारूगोळा वाहतूक करण्यासाठी कोटगाव येथील ८० शेतकऱ्यांची १४० एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. ६० वर्षांपूर्वी कोटगाव येथील शेतकऱ्यांनी जमीन कोणत्याही प्रकारचा विरोध न करता रेल्वेच्या स्वाधीन केली. मात्र त्याचा शेतकऱ्यांना ६० वर्षांत अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. अथवा आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. उलट या जमिनीचा वापर आता सिडको-रेल्वे प्रशासन नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पासाठी करीत आहे.

कोटनाका-काळाधोंडा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य प्रकारे मोबदला देण्यात यावा, रेल्वे प्रकल्पात प्रकल्पबाधितांना नोकरीतही सामावून घेण्यात यावे, भूमिपुत्रांना सुरू असलेल्या ठेकेदारीतील कामात प्राधान्य दिले जावे, व्यावसायिक गाळे मिळावेत यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही. रेल्वे व सिडको प्रशासन दाद देण्यास तयार नाही. यामुळे स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या दरम्यान ग्रामस्थांनी तीन वेळा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडले आहे. त्यानंतरही सिडको-रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. न्यायालयीन लढाईबरोबरच स्थानिक पातळीवरही आंदोलन सुरूच राहणार आहे. न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही नीलेश भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई