शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये प्रचाराची धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:17 PM

प्रत्येक नोडमध्ये रॅली : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांची धावपळ; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

नवी मुंबई : प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्यामुळे नवी मुंबईसह, पनवेल, उरणमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला होता. सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक नोडमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. घरोघरी जाऊन कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत होते.

ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघामध्ये रविवारी सकाळीपासून रॅली व सभांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये आठ लाख ४६ हजार मतदार आहेत. शहरवासी दिवसभर नोकरी, व्यावसायानिमित्त घराबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवार हा एकच दिवस भेटत असतो. शेवटचा रविवार असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करा, अशा सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये जाऊन पत्रके वाटण्यास सुरुवात केली होती. अनेक घरांमध्ये तीन ते चार पक्षांचे कार्यकर्ते एकाच दिवशी पोहोचल्याचेही पाहावयास मिळत होते.

राष्ट्रवादी काँगे्रसने रॅलींसह सानपाडा व ऐरोलीमध्ये अमोल मिटकरी यांच्या सभांचे आयोजन केले होते. भाजपच्या वतीने ऐरोली मतदारसंघामध्ये कोपरखैरणे गाव, प्रभाग ४६, ४७, ४५, ३७ व ३८ मध्ये उमेदवार गणेश नाईक यांनी रॅली काढली.बेलापूर मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे यांच्या नेरुळ परिसरामध्ये रॅलीचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या रॅलींमुळे नवी मुंबईमधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते.

उरण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना गावांमध्ये जाऊन प्रचार करा, अशा सूचना दिल्या होत्या. उरण मतदारसंघ खालापूर तालुक्यातील चौकपर्यंत पसरला आहे. यामुळे उमेदवारांची सर्व मतदारांपर्यंत जाण्यासाठी धावपळ होत आहे. नवी मुुंबई, पनवेल व उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये सातारा व इतर मतदारसंघांमधील उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये सातारा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. जावली तालुक्यामधील कार्यकर्त्यांशीसंवाद साधण्यासाठी ही सभा आयोजित केली होती.मतदारांना गावाकडेयेण्याचे आवाहनसातारा मतदारसंघातील भाजप उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी व सातारा तालुक्यामधील मतदारांशी संवाद साधला. ज्या मुंबई, नवी मुंबईकरांचे गावाकडील मतदारसंघात नाव आहे त्यांनी मतदानासाठी गावाकडे येण्याचे आवाहन केले. रविवारी कोरेगाव, वाई, माण व इतर मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांनीही नवी मुंबईमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना गावाकडे येण्याचे आवाहन केले.नेत्यांच्या आदेशामुळे प्रचारामध्ये उत्साहबेलापूर मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक मंदा म्हात्रे यांचा प्रचार करणार का? याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते; परंतु नाईकांनी ताकदीने प्रचारामध्ये उतरण्याचे आदेश सर्व पदाधिकाºयांना दिले आहेत. यामुळे रॅलीमध्ये नवे, जुने सर्व भाजप पदाधिकारी सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

कार्यकर्ते समोरासमोररविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती, यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येत होते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा प्रचार करणारे अनेक जण या वेळी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांचे काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये आहेत, यामुळे गतवेळी एकाच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले पदाधिकारी या वेळी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, असे चित्र नेरुळ, सारसोळे, सीवूडमध्ये पाहावयास मिळत होते.बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्नच्माने यांना माघार घेऊन भाजपला पाठिंबा देण्यासाठी मन वळविण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेत्यांची त्यांच्याशी संवाद साधला असून आता माने सोमवारी नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पनवेलमध्ये ग्रामीण भागात प्रचारावर जोरपनवेल : पनवेल मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रचारावर भाजपने जोर दिला आहे. ग्रामीण भागात शेकापचा पारंपरिक मतदार असल्याने भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन रविवारी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार दौºयादरम्यान केले. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पालीदेवद, देवद, विचुंबे, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई असा प्रचारदौरा होता. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातशहरी भागात भाजपची एकहाती सत्ता आहे.

पनवेल महानगरपालिकेतभाजपचे सर्वात जास्त नगरसेवकशहरी भागातून निवडून आलेआहेत. मात्र, ग्रामीण भागातशेकापचे वर्चस्व असल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून ग्रामीण भागातही भाजपला मताधिक्य मिळवून देण्याच्या प्रयत्नाने भाजपने प्रचाराचा जोर वाढविला आहे.या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, सरचिटणीस प्रल्हाद केणी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागीझाले होते.

टॅग्स :panvel-acपनवेल