शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनची शॉन कॉक्सी ठरली विश्वविजेती

By admin | Updated: June 30, 2017 03:02 IST

वाशी येथे नुकताच पार पडलेल्या आयएफएससी विश्वचषक क्लाइंबिंग स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या शॉना कॉक्सी हिने आपले वर्चस्व राखताना महिला गटात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाशी येथे नुकताच पार पडलेल्या आयएफएससी विश्वचषक क्लाइंबिंग स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या शॉना कॉक्सी हिने आपले वर्चस्व राखताना महिला गटात विजेतेपदावर नाव कोरले. त्याचवेळी, पुरुष गटात कोरियाच्या जाँगवॉन चॉन याने जेतेपदाला गवसणी घातली. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत जगभरातील अव्वल क्लाइंबर्सनी आपले कौशल्य दाखवले.आंतरराष्ट्रीय क्लाइंबिंग क्रीडा संघटनेच्या (आयएफएससी) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत यजमान भारताच्या खेळाडूंनीही चमक दाखवली; परंतु मोक्याच्या वेळी प्रयत्न कमी पडल्याने त्यांना काही गुणांचा फटका बसला. संपूर्ण स्पर्धेत भारताला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. ब्रिटनच्या कोक्सीने पहिल्या फेरीपासून वर्चस्व राखत मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत सहजपणे जेतेपदाला गवसणी घातली. कोक्सीला ११ प्रयत्नांमध्ये चार टॉप (४टी ११) साध्य करायचे होते. तसेच, ४ बोनस गुण मिळवण्यासाठी तीला ८ प्रयत्नांत दिलेले लक्ष्य साध्य करायचे होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारी कोक्सी ब्रिटनची पहिली खेळाडू ठरली. त्याचवेळी मिहो नोनाका आणि अकियो नोगुची या जपानच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, पुरुष गटात कोरियाच्या चॉनने देखील सहजपणे बाजी मारताना प्रतिस्पर्धी खेळाडूंना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याने प्रत्येक प्रकारात अव्वल स्थान पटकावताना आपले विश्वविजेतेपद निश्चित केले.