न भूतो! कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 13:17 IST2020-09-30T13:17:20+5:302020-09-30T13:17:56+5:30
सकाळी 10.30 च्या सुमारास महामार्गावरील काँक्रिटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम सुरु होते.

न भूतो! कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या
पनवेल : सायन पनवेल महामार्गावरील महत्वाचा असलेल्या कळंबोली उड्डाणपुलावर एकापाठोपाठ तब्बल 25 गाड्या आदळल्याची घटना घडली. असे अपघात दिल्ली-यमुना एक्स्प्रेस वेवर दाट धुके असताना होतात. मात्र, इथे हा विचित्र अपघात भर उन्हात झाला आहे.
सकाळी 10.30 च्या सुमारास महामार्गावरील काँक्रिटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम सुरु होते. कामगार रस्त्यावर असताना त्यांनी हलगर्जीपणा केल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काम सुरु असताना वाहनांना मार्गदर्शन करणारे फलक, झेंडे किंवा निशानी ठेवण्यात आली नसण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन चालकांच्या लक्षात न आल्याने एकामागोमाग एक येत असलेली वाहने एकमेकांवर धडकली.
या अपघातामुळे रस्तयावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.