शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमाफिया सुसाट; बांधकामे तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:51 IST

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी भूमाफियांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरापासून शहरात बेकायदा बांधकामांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. विशेषत: गावगावठाणात अर्धवट अवस्थेत बंद पडलेली बांधकामे पुन्हा तेजीत सुरू झाली आहे. तर बहुतांशी गावांच्या खाडीकिनाऱ्यावर खारफुटीवर भराव टाकून झोपड्या उभारण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या फिफ्टी फिफ्टी बांधकामांचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ पर्यंतची ही बांधकामे नियमित करण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे; परंतु त्याबाबत ठोस धोरण तयार होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर सिडको व महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपली सुरू असलेली बांधकामे बंद केली. फिफ्टी फिफ्टीच्या बांधकामांना आळा बसला. मात्र, चार वर्षांत बांधकामे नियमित होण्याच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही न झाल्याने अनधिकृत बांधकामे पुन्हा उभारली जाऊ लागली आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या बांधकामांनी वेग घेतल्याचे दिसून येते. महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागातील बहुतांशी अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. तसेच पोलीस यंत्रणासुद्धा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे नियमित कारवाईकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फायदा भूमाफियांनी घेतल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून याअगोदर कारवाई करून जमीनदोस्त झालेली बांधकामे पुन्हा उभारू लागली आहेत. तसेच मागील महिनाभरात अर्धवट अवस्थेतील बांधकामे पूर्ण झाली आहेत. घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोलीसह कोपरी, सानपाडा आदी विभागात पुन्हा बेकायदा बांधकामे जोमात सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातही अनधिकृत झोपड्या उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा गोदामे बांधून ते भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या ऐरोली मतदारसंघासह बेलापूर मतदारसंघातील गावगावठाणे, बैठ्या वसाहती आदी ठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू असल्याचे दिसून येते. 

‘नैना’ क्षेत्रातही बांधकामांचा धडाकाआचारसंहिता लागू होताच सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. ‘नैना’च्या पहिल्या टप्प्याच्या विकासाचे नियोजन सिडकोने हाती घेतले आहे. दुसºया टप्प्याचा विकास आराखडाही मंजूर झाला आहे. त्यामुळे या विभागात अनधिकृत बांधकामे उभारणार नाहीत, याची दक्षता संबंधित विभागाकडून घेतली जात आहे. मात्र, निवडणुकीची धामधूम भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने या क्षेत्रात आजमितीस मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण