शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी

By admin | Updated: July 8, 2017 05:52 IST

मुंबई-पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे, त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : मुंबई-पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे, त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधब्यावर फिरायला-मजा करण्यासाठी येत असतात. मात्र मौजमजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी ७ जुलै रोजी तालुक्यातील सोनलपाडा धरणात तीन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या धबधब्यावर व धरणावर दोन महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे दोन महिने पर्यटकांना या धबधब्यावर व धरणावर फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही.कर्जत तालुक्यात आषाणे- कोषाणे धबधबा, वदप, मोहिली, टपालवाडी, पेब, पळसदरी धबधबा असे लहान-मोठे अनेक धबधबे आहेत, तर सोलनपाडा, पळसदरी धरणे आहेत. या धबधब्यावर आणि धरणावर शनिवार, रविवार पर्यटकांचा महापूर येत असतो. तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभल्याने येथे येण्याचा आणि पाण्यात भिजण्याचा मोह आवरत नाही. मागील दोन-तीन वर्षांत तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटक मौजमजा करायच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. मागील दोन वर्षांत झालेल्या घटना पाहता कर्जत पोलीस ठाणे, आणि नेरळ पोलीस ठाणे यांनी झालेल्या घटनांचा अहवाल तहसील कार्यालयात पाठवला. हा अहवाल प्रांत कार्यालयाला आला होता. दरम्यान, शुक्रवारी तिघे जण सोलनपाडा येथे बुडाल्याची घटना समोर ठेवून तालुक्यातील महत्त्वाची ठिकाणे आणि धोक्याची ठिकाणे धबधबे, तलाव येथे पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. प्रतिबंधात्मक आदेश शुक्रवारी ७ जुलैपासून ६ सप्टेंबर २०१७ असा दोन महिन्यांसाठी लागू केला असल्याची माहिती प्रांत दत्ता भडकवाड यांनी दिली.