शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमण’चे पोलीस ठाणे जुन्या मुख्यालयात

By admin | Updated: September 11, 2015 01:42 IST

अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा त्यासाठी उपलब्ध

नवी मुंबई : अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. झोपड्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महापालिकेस पोलीस बंदोबस्ताची गरज असते. अनेक वेळा बंदोबस्ताअभावी कारवाई थांबवावी लागते. यामुळे अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पोलीस स्टेशनमध्ये ३६ अधिकारी व जवळपास १०६ कर्मचारी असणार आहेत. यांच्यासाठी बैठक व आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्याची सूचना शासनाने केली आहे. अतिक्रमण विभागाने जुन्या मुख्यालयामधील जागेचीमागणी केली होती. सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. महापालिकेने जुन्या मुख्यालयातील तळमजला, पहिला, सातवा व आठवा मजला भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु फक्त कोकण रेल्वेची निविदा आली होती. यामुळे ती रद्द करण्यात आली. दरम्यान, राजमाता जिजाऊ मिशन माता बाल आरोग्य व पोषण मिशनसाठी आठव्या मजल्यावरील २६१ चौरस मीटर जागा, एनएमएमटीसाठी सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा देण्याचे निश्चित करण्यात आले असून आठव्या मजल्यावरील १०४५ चौरस मीटर जागेसाठी पुन्हा भाडे निश्चित करून निविदा मागविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)