शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

भूतदयेला जागलेली अनामिका चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 1:49 AM

पनवेलच्या रस्त्यावरील शेकडो भटक्या कुत्र्यांचे केले पालन पोषण

वैभव गायकर

पनवेल : लहानपणापासून प्राण्यांसाठी काहीतरी करावे अशी भावना बाळगलेल्या अनामिका चौधरी या हजारो मोकाट पाळीव प्राण्यांचे पालन पोषण करून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांनी हँड दॅट हिल संस्था सुरू केली आहे. विशेष म्हणजे पाळीव प्राणी मोकाट कुत्र्यांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते. मात्र, अनामिका याला अपवाद आहेत. त्या दररोज मोकाट कुत्र्यांवर उपचार करतात. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य परिसरात अनामिका यांचे ॲनिमल सेंटर कार्यरत आहे. याठिकाणी आजही ७०० पेक्षा जास्त रस्त्यावर पडलेले कुत्रे , मांजरी , गाढव आदींसह विविध प्राण्यांचे पालन पोषण केले जात आहे. 

आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रिया देखील केली जाते. याकरिता काही सामाजिक क्षेत्रातील मंडळी मदतीसाठी येतात. मात्र चौधरी या यामध्ये मुख्य दुवा बनल्या आहेत. केवळ विकास, स्वतःच्या  प्रगतीकडे लक्ष न देता मुक्या प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी हे देखील आपले कर्तव्य समजून ते यशस्वीपणे पार पडणाऱ्या अशा महिलांमुळेच समाजाची जडणघडण योग्य दिशेने होत असते.

शेकडो प्राण्यांना जीवनदाननवी मुंबई विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे सिडकोने स्थलांतरित केली. ग्रामस्थांचे पुनर्वसन केले. मात्र, मोकाट कुत्रे , मांजरे , गुरे- ढोरे आदींसह पक्षी , प्राण्यांबाबत  धोरण राबविले नाही. अनामिका यांनी स्वतः गावात फिरून शेकडो कुत्रे , मांजरी, गुरे यांना आपल्या सेंटरमध्ये निवारा उपलब्ध करून दिला. 

माझ्या वडिलांना मी नेहमीच मुक्या प्राण्यांना मदतीचा हात देताना मी पाहत आले आहे. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेऊन माझे कर्तव्य पार पाडत आहे. हे काम करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. समाजातील काही मंडळी यामध्ये आडकाठी करण्याचे काम करत असतात. पण, मी माझे काम करत राहते     -अनामिका चौधरी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWomen's Day Specialजागतिक महिला दिन