शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक सुगडी बनविण्यासाठी व्यावसायिकांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:18 IST

अवकाळी पावसामुळे पारंपरिक कुंभार व्यवसायावर संक्रांत

दासगाव : मकरसंक्रांतीसाठी रायगड जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या कारागिरांची सुगड बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कारागिरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या यामुळे सुगडालाही पूर्वीप्रमाणे मागणी राहिली नसली तरी परंपरा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुंभार व्यवसायावर अवकाळी पावसाने मात्र संक्रांत आणली आहे.

महाड परिसरामध्ये कुंभार समाज आपला पारंपरिक माती व्यवसाय आजही जपत आहे. वयोवृद्ध कलाकार आपली ही कला जपत उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. मातीच्या चुली, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, थंड पाण्यासाठी लागणारे माठ व संक्रांतीसाठी लागणारे सुगड बनविण्याचे काम हा समाज सातत्याने करत आहे. काही ठिकाणी मातीचे कोने बनवले जात असतात. परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांशी वस्तूंची मागणी कमी होऊ लागली आहे. अनेक कारागीर माती व्यवसायामध्ये आजही काम करत आहेत. सध्या रायगड जिल्ह्यातील कुंभारवाड्यांमध्ये संक्रांतीसाठी लागणारे सुगड बनवले जात आहेत. लहान सुगड दहा रुपये तर मोठे सुगड वीस रुपयांनी विकले जात आहे.

सुगड बनवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागत असतो. सध्या महाड तालुक्यात सुमारे पाच हजार सुगडी बनवून विक्रीसाठी तयार झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यामध्ये दोन लाख सुगडींची विक्री होत असे, परंतु आता ही संख्या जेमतेम ६० हजारांपर्यंत पोहोचली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सुगडीचा वापर आता कमी होऊ लागला आहे. त्यातच सुगड व इतर वस्तू बनवण्यासाठी लागणारी माती, भाजण्यासाठी लागणारा कोंडा, कोळसा याच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे या व्यवसायावर संक्रांत आली आहे. 

मागणीच्या काळात माती भिजलीगेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात अवकाळी पाऊस पाडत आहे. यामुळे बनवलेल्या विटा, चुली आणि सुगडी पावसात भिजल्या आहेत. त्यातच यासाठी लागणारी माती आणि भट्ट्यादेखील भिजल्या आहेत. यामुळे मागणीच्या काळातच माती भिजल्याने सुगडी बनवण्यास कालावधी लागणार आहे.

कुंभार समाजावर अवकाळी पावसाने संक्रांत आणली आहे.कुंभार समाजाला पारंपरिक वस्तू बनवण्याचे आधुनिक प्रशिक्षण मिळावे. तसेच रेल्वे स्थानकामध्ये चहा देण्यासाठी वापरण्यात येणारे कुल्हड राज्यात महाराष्ट्रातील कुंभार समाजाकडून खरेदी केले जावेत. विविध आर्थिक योजना समाजापर्यंत पोहोचव्यात. मातीसाठी लागणारी रॉयल्टी माफ केली जावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.- सुभाष शिरशिवकर (कुंभार समाज सल्लागार)

माती, कोळसा, कोंडा हे आता विकत घ्यावे लागते व त्यासोबत मेहनतीचा विचार करता हा व्यवसाय आता परवडत नाही.- अंजना चांढवेकर, कारागीर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई