शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

नागरीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 00:24 IST

रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यातील ‘भाताचे कोठार’ अशी ओळख असलेल्या कृषिप्रधान रायगड जिल्ह्यातील नागरीकरण वाढू लागले आहे. शेतीसाठीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. सिडकोसाठी यापूर्वीच दोन जिल्ह्यांतील १५९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर शहराची उभारणी झाली आहे. आता विमानतळ प्रभावी क्षेत्रातील सहा तालुक्यांमधील तब्बल ५६१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर टप्प्याटप्प्याने २३ स्मार्ट सिटी उभ्या करण्यात येणार आहेत. यामुळे या पट्ट्यातून शेती हद्दपार होण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. येथील बंदरातून शेकडो वर्षांपासून भात व इतर वस्तूंचा व्यापार देश व विदेशातही होऊ लागला. भातशेती, मिठागरे व मासेमारी हाच या परिसरातील प्रमुख व्यवसाय होता; परंतु औद्योगिकीकरण व नागरीकरण वाढू लागले व या परिसरातील शेतीक्षेत्र कमी होऊ लागले. शेतीला सर्वप्रथम सुरुंग लागला तो सिडकोच्या निर्मितीनंतर शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील ९५ गावांमधील जमीन संपादित करून नवी मुंबई वसविण्याची मागणी केली. तब्बल १५९ चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली व या परिसरातील शेतकरी भूमिहीन झाला. यानंतर तळोजा औद्योगिक वसाहत, रसायनी औद्योगिक वसाहत, जेएनपीटी व त्या अनुषंगाने उरणमध्ये आलेले उद्योग यामुळे दोन्ही तालुक्यांमधील शेतीचे क्षेत्र कमी होत गेले. उरलेली शेती विमानतळ प्रकल्पामुळे संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शासनाने विमानतळापासून २५ किलोमीटर परिसर विमानळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून घोषित केला आहे.‘नैना’ परिसरामध्ये तब्बल २७० गावांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल तालुक्यामधील १११, उरणमधील पाच, कर्जतमधील सहा, खालापूरमधील ५६, पेणमधील ७८ व ठाणेमधील १४ गावांचा समावेश आहे. या परिसरातील ५६१ चौरस किलोमीटर क्षेत्राचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. पनवेलपासून थेट कर्जत, खालापूर ते पेणपर्यंत शहरांचा विकास होणार आहे. या परिसरामध्ये दहा वर्षांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. नागरिकांना परवडतील, अशा दरामध्ये घरे उपलब्ध होतील. प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे भासविले जात आहे; परंतु शहरीकरण करताना या परिसरातील शेती नष्ट होणार असल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेती नष्ट झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची शक्यता आहे. शहरीकरण वाढल्यामुळे नागरी समस्यांमध्येही वाढ होणार आहे. सिमेंटचे जंगल उभे राहणार; परंतु त्यांना पाणी व इतर सुविधा कशा उपलब्ध होणार हा प्रश्नच आहे. विकासाच्या घाईमध्ये शेती ठप्पच होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फक्त ‘नैना’च नाही तर भविष्यात रोहा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमधील ४० गावांमध्येही नवीन शहर वसविण्याचा शासनाचा इरादा आहे.या प्रकल्पांमुळे शेतजमीन कमी झालीरायगड जिल्ह्यात सिडको, जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तळोजा औद्योगिक वसाहत, रसायनी औद्योगिक वसाहत व आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावीत क्षेत्र (नैना) यामुळे या परिसरातील शेतजमीन कमी झाली आहे व भविष्यात होणार आहे.नागरीकरणामुळे हे होणार दुष्परिणामपनवेल परिसरातील नागरीकरणामुळे या परिसरातील गाढी व कासाडी नदी प्रदूषित झाली. नद्यांना नाल्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. या परिसरातील प्रदूषण वाढले आहे. सिडकोमुळे शेतकरी भूमिहीन झाले. नागरीकरणामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी हीच सर्वात गंभीर समस्या राहणार आहे.रायगड जिल्ह्यातीलशेतजमिनीचा तपशीलतालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)पनवेल १७,९९२ ५७,९५२उरण ८,४१९ १८,६४२अलिबाग ३४,०१७ ४९,९०१पेण १९,०२३ ४९,९९८मुरुड १०,६१० २६,५२५कर्जत २०,३५३ ६५,११७खालापूर ९,५३५ ४०,६१६माणगाव ४९,३२४ ९३,६५९रोहा १९,०९३ ६३,२३९सुधागड-पाली १०,२४७ ४५,८०१महाड ४०,३८८ ८१,०४७पोलादपूर ११,१४५ ३७,२०४म्हसळा १५,०५३ ३१,१७०श्रीवर्धन १४,४०७ २६,०२१‘नैना’ परिसरातील गावांचा तपशीलतालुका गावांची संख्यापनवेल १११उरण ०५कर्जत ०६खालापूर ५६पेण ७८ठाणे १४एकूण २७०नवी मुंबई वसविण्यासाठी व ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांची सर्व जमीन संपादित करण्यात आली. येथील शेतकरी भूमिहीन झाला. ‘नैना’ व इतर प्रकल्पांमुळे पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्यातील शेतजमीनही कमी होऊ लागली आहे.- अमोल नाईक, शेतकरी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई