शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: December 22, 2015 00:39 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेग व अतिआवाजात रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या एक हजार ५७७ व्यक्तींवर गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी कायदेशीर कारवाई केली

जयंत धुळप,  अलिबागवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेग व अतिआवाजात रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या एक हजार ५७७ व्यक्तींवर गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी कायदेशीर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका विशेष बैठकीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन अधिक वेग आणि आवाजाच्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत धरुनच चालावे लागत असल्याची समस्या यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी हक यांच्यासमोर मांडली होती. त्याची गंभीर दखल घेऊन खातरजमा करुन रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेस याबाबत कारवाई करण्याचे आदेश हक यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यात ही कारवाई करण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी विशेष बैठक आयोजित करुन जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या बैठकीतील बेदरकार आणि वाहतुकीचे नियम तोडून चालणाऱ्या वाहनांच्या समस्येची त्यांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे. माझ्या आठवणीत अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना विचारात घेवून, त्यांची समस्या सोडवण्याकरिता पोलीस विभागाकडून प्रथम ठोस कारवाई होत आहे, हे आम्हा ज्येष्ठ नागरिकांकरिता निश्चितच आनंददायी असून आम्ही मनापासून रायगड पोलिसांचे आभार मानून, त्यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ल. नी. नातू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.