लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; मदत मागण्याच्या नावाखाली घुसायचे सोसायटीत 

By सूर्यकांत वाघमारे | Published: April 21, 2023 04:41 PM2023-04-21T16:41:28+5:302023-04-21T16:41:54+5:30

नवी मुंबई : चॅरिटीच्या नावाखाली मदत मागण्याच्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश करून मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना रबाळे पोलिसांनी अटक ...

A gang that stole laptops mobile phones was arrested They used to enter the society under the name of asking for help | लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; मदत मागण्याच्या नावाखाली घुसायचे सोसायटीत 

लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; मदत मागण्याच्या नावाखाली घुसायचे सोसायटीत 

googlenewsNext

नवी मुंबई : चॅरिटीच्या नावाखाली मदत मागण्याच्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश करून मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील चार लॅपटॉप व २ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीने नवी मुंबईतून चोरलेले मोबाईल व लॅपटॉप कर्नाटकासह तमिळनाडू व गोव्याला विकल्याचे सांगितले आहे. 

सकाळच्या वेळी घरातून मोबाईल व लॅपटॉप चोरीला जात असल्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. अशा गुन्ह्यांमद्ये सक्रिय टोळ्यांचा उलगडा करण्यासाठी रबाळे पोलिस प्रयत्न करत होते. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक दुलबा ढाकणे यांनी निरीक्षक भगूजी औटी, चंद्रकांत लांडगे, सहायक निरीक्षक दीपक खरात, नामदेव मानकुंबरे, शंकर शिंदे, दर्शन कटके व मयूर सोनवणे आदींचे पथक केले होते. या पथकाने सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून संशयित टोळीची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ऐरोली परिसरात पाळत ठेवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये एकजण मुका असून उर्वरित दोघांसह ते चॅरिटी जमा करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना शंका असल्याने सखोल चौकशी करत त्यांचे कर्नाटकातील मूळ गाव गाठले असता त्यांचा बनाव उघड होताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार तिघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवराजा डी.टी. तिपेशा उर्फ तिपेशा वडार, अनाप्पा वडार व सुंदरमा वडार अशी त्यांची नावे आहेत. सुंदरमा हि सर्वप्रथम एखाद्या इमारतीमध्ये प्रवेश करून दरवाजा उघडा असलेल्या घरांची माहिती उर्वरित दोघांना द्यायची. त्यानंतर शिवराजा व अनाप्पा यापैकी एकजण मुक्याचे सोंग घेऊन मदत मागण्या बहाण्याने सोसायटीत येऊन दरवाजा उघडा असलेल्या घरात घुसून उघड्यावर ठेवलेले मोबाईल व लॅपटॉप चोरून जायचे. अशा प्रकारे त्यांनी रबाळे पोलिसठाने हद्दीत केलेले सात गुन्हे उघड झाले असून त्यामधील चार लॅपटॉप व दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यांनी इतरही गुन्हे केले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. चोरलेले लॅपटॉप कर्नाटक, तमिळनाडू व गोवा येथे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विकल्याचे कबुली दिली आहे.

Web Title: A gang that stole laptops mobile phones was arrested They used to enter the society under the name of asking for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.