रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरची धडक, आठ वर्षाची चिमुकली जागीच ठार, नवी मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:55 IST2025-04-15T19:55:02+5:302025-04-15T19:55:02+5:30
नवी मुंबईत रस्ता ओलांडताना एका भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत आठ वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरची धडक, आठ वर्षाची चिमुकली जागीच ठार, नवी मुंबईतील घटना
नवी मुंबईत जेएनपीटीच्या प्री-गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना एका भरधाव ट्रेलरने आठ वर्षाच्या चिमुकलीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्योती भागवत शिंदे, असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ती उरणमधील नागरा फाट्याजवळील झोपडपट्टीत आई-वडील आणि आपल्या दोन लहान भावांसोबत राहत होती. अपघाताच्या दिवशी ज्योत ही तिची आई आणि दोन भांवासोबत वडघर फाट्याजवळील त्यांच्या घराकडे जात होती. त्यावेळी जेएनपीटीच्या प्री-गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरने तिला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्योतीचा जागीच मृत्यू झाला
याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. ट्रेलर चालक जेएनपीटीहून पानवेलेकड जात असताना हा अपघात झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.