शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ५ हजार धोकादायक इमारती

By admin | Updated: August 10, 2015 02:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही

पंकज रोडेकर, ठाणेजिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही. तसेच ४८ तास उलटूनही एकाही महापालिकेने त्याबाबत माहिती न दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये सुमारे ५ हजार अतिधोकादायक आाणि धोकादायक इमारतींचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६८३ अतिधोकादायक तर ४२८० धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे लाखोंचे जीव टांगणीला लागले आहेत.भिवंडी अतिधोकादायकमध्ये तर धोकादायक इमारतींत ठाणे महापालिका आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत एकही अतिधोकादायक इमारत नसली तरी धोकादायक इमारतींचा आकडा तेथे शंभरच्या घरात पोहोचला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये एक अतिधोकादायक तर ६ धोकादायक इमारती असल्याचे त्या महापालिकेने दिलेल्या माहितीत नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी तातडीने सर्व महापालिकांची विशेष बैठक बोलविली होती. त्या वेळी ठाकुर्ली येथे काही दिवसांपूर्वी पडलेली इमारत आणि नौपाडा येथील इमारत दुर्घटना यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे निष्कासन करून त्यांना तात्पुरता निवारा देणे गरजेचे आहे. तसेच महापालिकांना अशा इमारती पाडण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण मिळते का, अशी विचारणा केली. पालिकांनी किती वेळा अशा रीतीने पोलीस संरक्षण मागविल्याची माहितीही (आकस्मिक आराखडा ) २४ तासांत सादर करण्याचे निर्देश त्या वेळी त्यांनी दिले होते. मात्र, एकाही महापालिकेने याबाबत २४ तासांत नाही तर ४८ तास झाल्यानंतरही माहिती सादर केली नव्हती. नाइलाजाने अखेर जिल्हा प्रशासनानेच त्यांच्या पाठीमागे लागून माहिती गोळा केली. त्यात, ठाणे महापालिकेने २८ अतिधोकादायक इमारतींवर क ारवाई केलेली आहे. १४ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. तर, उर्वरित १६ इमारती रिकाम्या करण्यास पोलिसांना निर्देश दिले असल्याचे सांगितले आहे.