वेश्या व्यवसायातून ४ महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:11 IST2024-03-09T14:11:09+5:302024-03-09T14:11:26+5:30

खांदेश्वर पोलिस ठाणे हद्दीत सुकापूर येथील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.

4 women freed from prostitution | वेश्या व्यवसायातून ४ महिलांची सुटका

वेश्या व्यवसायातून ४ महिलांची सुटका

नवी मुंबई : सुकापूर येथील लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी कारवाई केली आहे. तेथून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून  तेथे अवैध धंदा सुरू होता.

खांदेश्वर पोलिस ठाणे हद्दीत सुकापूर येथील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री बनावट ग्राहक तयार करून तेथे छापा टाकला. या वेळी तेथील चार महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी चौघांवर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: 4 women freed from prostitution