शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

शहरात ३५३ मद्यपी चालकांवर कारवाई; परवाना निलंबनासाठी न्यायालयाकडे होणार मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:29 AM

थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे.

नवी मुंबई : थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे. त्यामुळे या चालकांना थर्टीफर्स्टची नशा चांगलीच भोवणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते; परंतु अनेक जण पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडतात, त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाया केल्या जातात, त्याकरिता सोमवारी रात्री संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३५० ठिकाणी बॅरिकेड्स लावून मद्यपी चालकांची शोधमोहीम सुरू होती. त्याशिवाय पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा, विशेष शाखा, दोन्ही परिमंडळ तसेच गुन्हे शाखेचे उपआयुक्त यांच्याकडून शहरातल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. या दरम्यान, ३५३ जणांवर मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांचे चालक परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून न्यायालयाकडे मागणी केली जाणार आहे, त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना नशा करून वाहन चालवण्याचे केलेले धाडस त्यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच भोवणार आहे. गतवर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री संपूर्ण आयुक्तालयात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ४२४ कारवाया झाल्या होत्या. यंदा त्यात ७१ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होता, त्याकरिता वाहतूक शाखेचे २७१ पोलीस, इतर शाखेचे ८९ पोलीस व अधिकारी असा सुमारे ३६० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त थर्टीफर्स्टच्या रात्री परिमंडळ एक व दोन मध्ये लावण्यात आला होता, त्याकरिता ३५० ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, त्यापैकी ४० ठिकाणी ब्रेथ अ‍ॅनेलायझर मशिनचा वापर करण्यात आला. उर्वरित ठिकाणी वाहनचालकाला नाव विचारण्याच्या बहाण्याने त्याला बोलते करून मद्याचा वास हुंगण्याची शक्कल पोलिसांना लढवावी लागली. संभाव्य कारवाईच्या भीतीनेही अनेकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळले, त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या कारवाईत घट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता वाहतूक शाखा उपआयुक्त सुनील लोखंडे, परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोध दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त लावण्यात आला होता, त्यानुसार एकूण ३५३ कारवायांपैकी परिमंडळ एक मध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७६ कारवाया झाल्या आहेत, त्यामध्ये सर्वाधिक ५८ कारवाया तुर्भे एमआयडीसी पोलीसठाणेच्या हद्दीत झाल्या आहेत. त्याशिवाय दारूबंदी कायद्यांतर्गतही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर एनआरआय पोलीसठाण्याच्या हद्दीत अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिफ शेख हे दिवाळे गावातून कारने जात असताना रस्त्यात आडवी रिक्षा उभी होती, त्यांनी हॉर्न वाजवून रिक्षा हटवण्यास सांगितले असता, त्यामध्ये बसलेल्या चौघांनी कारवर दगडफेक करून तसेच शेख यांना मारहाण करून पळ काढला. यामध्ये ते बेशुद्ध झाले असता, उपचारानंतर ते शुद्धीवर आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई