शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६ लाख मजुरांना वर्षभर रोजगार

By admin | Updated: October 5, 2015 00:15 IST

पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर

सुरेश लोखंडे,ठाणेपावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर काम देण्यासाठी ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणांनी नरेगाच्या माध्यमातून सुमारे पाच हजार ८९० शेल्फची कामे उपलब्ध केली आहेत. त्याद्वारे १६ लाख सात हजार ७५५ मजुरांच्या हातांना काम मिळणार आहे. दुष्काळात मजुरांच्या हातांना नरेगाद्वारे कामे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसह शासकीय यंत्रणांनी गावपाड्यांमध्ये विविध स्वरूपांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींनी तीन हजार ९९७ कामे काढून त्याद्वारे आठ लाख नऊ हजार ५०६ मजुरांना काम दिले जाणार आहे. याप्रमाणेच इतर यंत्रणांनी एक हजार ८९३ कामे उपलब्ध करून त्याद्वारे सात लाख ९८ हजार २४९ मजुरांना रोजगार देण्यात येणार आहे. आदिवासी, दुर्गम भागातील मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे विविध कामे काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार, अकुशल कामगारांसाठी पाच हजार ८९० कामे शेल्फवर काढली आहेत. त्यावर कमीतकमी १६ लाख सात हजार ७५५ मजुरांना कामे करता येणार आहेत. यासाठी १८१ रुपये मजुरी निश्चित केली आहे. या आधी एप्रिल महिन्यापर्यंत या नरेगाच्या मजुरांना केवळ १६५ रुपये मजुरी मिळत असे. त्यात आता वाढ झाली आहे.