शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे- अमिरात

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

सीन विलियम्सचा झंझावात : यूएईवर चार गडी राखून मात

सीन विलियम्सचा झंझावात : यूएईवर चार गडी राखून मात
झिम्बाब्वे विजयी पथावर
नेल्सन : अनुभवी फलंदाज सीन विलियम्स याच्या शानदार ७६ धावांच्या बळावर झिम्बाब्वेने खडतर मार्ग काढून विश्वचषकात संयुक्त अरब अमिरात(यूएई) संघावर गुरुवारी चार गडी राखून मात केली. झिम्बाब्वेचा हा पहिला विजय आहे.
दोन कमकुवत संघातील ही लढत यूएईच्या झुंजार खेळीमुळे अखेरपर्यंत रंगतदार ठरली. यूएईने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ७ बाद २८५ धावा उभारल्या. वन डेतील ही त्यांची सवार्ेच्च खेळी होती. झिम्बाब्वेने ३३ व्या षटकापर्यंत अर्धा संघ गमविल्यानंतरही ६ बाद २८६ धावा असे लक्ष्य गाठले. विश्वचषकात त्यांनी गाठलेले हे सवार्ेच्च लक्ष्य होते. विलियम्सने कारकीर्दीत १८ वे अर्धशतक पूर्ण केले. क्रेग इर्विन याने ३२ चेंडूवर ४२ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करीत सामना खेचून आणला. याशिवाय ब्रेंडन टेलर ४७, सिकंदर रझा ४६ आणि रेगिस चकाबवा याने ३५ धावांचे योगदान दिले.
त्याआधी यूएईकडून कृष्णचंद्रणन ३४, खुर्रम खान ४५ आणि स्वप्नील पाटील ३२ यांनी धावसंख्येला आकार दिल्यानंतर पाकमध्ये जन्मलेल्या अन्वरने ५० चेंडूंवर ६७ धावा ठोकून कारकीर्दीतील सवार्ेच्च खेळी केली. झिम्बाब्वेकडून चताराने तीन बळी घेतले. झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद झाल्याने १५ षटकांत त्यांना विजयासाठी १०९ धावांची गरज होती. १९९६ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या यूएईला सामना जिंकण्याची संधी चालून आली पण विलियम्स-इर्विन यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
झिम्बाब्वेला पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. विलियम्सने सात चौकावर आणि एक षटकार ठोकला. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)