शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:27 IST

प्रसिद्ध युट्युबर अगस्त चौहान बाईक पळवताना व्हिडिओ काढत होता.

YouTuber accident: उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात एका प्रसिद्ध युट्युबरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलिगढमधील टप्पल पोलिस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा YouTuber ताशी 300 किलोमीटर वेगाने आपली सुपर बाइक चालवत होता. यादरम्यान दुचाकी डिव्हायडरला धडकली. 

प्रसिद्ध यूट्यूबर अगस्त्य चौहान आपल्या रेसिंग बाइकवरुन आग्राहून दिल्लीला जात होता. यादरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि बाईक दुभाजकावर आदळली. युट्युबरने हेल्मेट घातले होते, पण अपघात एवढा बीषण होता की, अगस्त्यचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

YouTuber दिल्लीचा रहिवासी होतामृत अगस्त्य चौहान हा दिल्लीचा रहिवासी होता. तो 'PRO RIDER 1000' नावाने यूट्यूब चॅनल चालवायचा. यावर तो आपल्या बाईकसह दैनंदिन आयुष्यातील व्हिडिओ टाकायचा. त्याच्या चॅनेलवर 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. अगस्त्य बाईक चालवताना प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. तो आपल्या व्हिडिओमध्ये लोकांना वेगाने गाडी न चालवण्याचा इशाराही द्यायचा.

बाईक 300 च्या स्पीडने पळवली...अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर 300 च्या वेगाने रेसिंग बाइक चालवत होता, यावेळी त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्याची बाईक डिव्हायडरला धडकल्याने अगस्त्यचा मृत्यू झाला. अगस्त्य दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होता. विशेष म्हणजे, अगस्त्य बाईक चालवताना व्हिडिओही बनवत होता.

 

टॅग्स :AccidentअपघातbikeबाईकDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश