Abhiyuday Mishra Dies : प्रसिद्ध YouTuber अभ्युदय मिश्राचा अपघाती मृत्यू, दुचाकीवरून करत होता मध्य प्रदेशचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 07:56 PM2022-09-29T19:56:00+5:302022-09-29T19:56:38+5:30

YouTuber Abhiyuday Mishra dies : मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूबर अभ्युदय मिश्रा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर बाईक घेऊन गेला होता.

youtuber abhiyuday mishra aka skylord dies in road accident in Madhya Pradesh | Abhiyuday Mishra Dies : प्रसिद्ध YouTuber अभ्युदय मिश्राचा अपघाती मृत्यू, दुचाकीवरून करत होता मध्य प्रदेशचा दौरा

Abhiyuday Mishra Dies : प्रसिद्ध YouTuber अभ्युदय मिश्राचा अपघाती मृत्यू, दुचाकीवरून करत होता मध्य प्रदेशचा दौरा

googlenewsNext

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि गेमर अभ्युदय मिश्रा (YouTuber Abhiyuday Mishra Aka SkyLord) याचा बाईकिंग टूर दरम्यान रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या जगात अभ्युदय मिश्राला 'स्कायलॉर्ड' म्हणून ओळखले जात होते. अभ्युदय मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूबर अभ्युदय मिश्रा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर बाईक घेऊन (बाईकिंग टूर) गेला होता. त्याने या टूरला 'एमपी टुरिझम रायडिंग टूर' असे नाव दिले होते. यादरम्यान नर्मदापुरम-पिपरिया राज्य महामार्गावर सोहागपूरजवळ त्याचा अपघात झाला. एका ट्रकने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अभ्युदय मिश्रा जबर जखमी झाला. त्याना भोपाळच्या बन्सल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.

अभ्युदय मिश्राची ही टूर मध्य प्रदेश पर्यटन विभागाने स्पॉन्सर केली होती. युट्यूबर अभ्युदय मिश्राचा  सोहागपूरमध्ये अपघात झाला होता. या वृत्ताला मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. तसेच, पोलिसांनी यूट्यूबर अभ्युदय मिश्राला धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, युट्यूबर अभ्युदय मिश्राची टूर 21 सप्टेंबर रोजी खजुराहो येथून सुरू झाली होती. तर भोपाळमध्ये 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी संपणार होती. पण, त्याआधीच युट्यूबर अभ्युदय मिश्राचा अपघात झाला.

युट्यूबवर जवळपास 14  लाख सबस्क्राइबर्स 
विशेष म्हणजे, अभ्युदय मिश्रा यांच्या स्कायलॉर्ड चॅनेलचे युट्यूबवर जवळपास 14  लाख सबस्क्राइबर्स आहेत. याशिवाय, अभ्युदय मिश्रा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याला 3.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. फ्री फायर गेमशी संबंधित कंटेटसह त्याने YouTube करिअरची सुरुवात केली. त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्याचे लाखो चाहते त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल 'मराठी' वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: youtuber abhiyuday mishra aka skylord dies in road accident in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.