माणुसकीला काळीमा...! दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 00:09 IST2021-06-21T00:04:45+5:302021-06-21T00:09:36+5:30
येथील गृहनिर्माणातील घर क्रमांक-346/2 मध्ये राहणाऱ्या रामौतार प्रजापती यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की जे घर त्यांनी एवढ्या कष्टाने उभे केले, त्याच घराच्या दरवाजावर त्यांचा मृतदेह ठेऊन मुलं भांडत बसतील.

माणुसकीला काळीमा...! दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह
मैनपुरी - उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील गृहनिर्माणातील घर क्रमांक-346/2 मध्ये राहणाऱ्या रामौतार प्रजापती यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की जे घर त्यांनी एवढ्या कष्टाने उभे केले, त्याच घराच्या दरवाजावर त्यांचा मृतदेह ठेऊन मुलं भांडत बसतील. हे प्रकरण आहे, वडिलांच्या मृत्यूनंतर झालेल्या दोन भावांतील संपत्तीच्या वादाचे. (Youths body was yearning for funeral in property dispute in mainpuri)
रामौतार यांचा छोटा मुलगा मनमोहन याने आपला मोठा भाऊ सुरेंद्र याच्यावर आरोप केला आहे, की त्याने 5 दिवसांपूर्वीच वडिलांकडून संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि 17 जूनच्या रात्री 1 वाजताच्या सुमारास वडिलांची गळा दाबून हत्या केली.
पोलिसांकडून मृतदेहाचे शवविच्छेदन -
तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. यात श्वास नलिकेत संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर ताब्यात घेतलेल्या मोठ्या मुलाला पोलिसांनी सोडले आहे. तर, कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोप केला आहे, की सुरेंद्र एलआयसी (LIC) एजंट आहे आणि त्याने एक माहिन्यापूर्वीच अपल्या वडिलांचा 50 लाख रुपयांचा विमा केला होता. यात तो स्वतःच नॉमिनी आहे. 5 दिवसांपूर्वीच वडिलांकडून आपल्या नावे करून घेतलेल्या संपत्तीत तो स्वतःच वारस आहे. तसेच, इतर सम्पत्तीतही तो बरोबरीचा वाटेकरी आहे.
यावेळी कुटुंबातील इतर काही सदस्य रामौतार प्रजापति यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे म्हणत होते. मात्र, पोलिसांनी समजावल्यानंतर रविवारी सायंकाळी रामौतार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामौतार हे अॅग्रीकल्चर विभागात सरकारी कर्मचारी होते.