शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गोपालनगरात तरुणाने लावला गळफास

By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST

नागपूर : गोपालनगरातील एका तरुणाने आज गळफास लावून आत्महत्या केली. राहुल कैलास सेलोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोपालनगर तिसऱ्या बसथांब्याजवळ राहात होता.

नागपूर : गोपालनगरातील एका तरुणाने आज गळफास लावून आत्महत्या केली. राहुल कैलास सेलोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोपालनगर तिसऱ्या बसथांब्याजवळ राहात होता.
घरापासून काही अंतरावरच राहुलचे छोटू पान पॅलेस आहे. राहुलच्या पारिवारीक सूत्रानुसार, गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. कुणाला काही सांगतही नव्हता. आज सकाळपासून तो घरीच होता. त्यामुळे त्याचे मित्र सचिन आज रात्री ७ च्या सुमारास त्याच्या घरी गेले. राहुलच्या घराचे दार उघडेच होते. घरी कुणीच नव्हते. त्यामुळे आवाज देताच सचिन सरळ राहुलच्या खोलीत गेले. त्यांना राहुल गळफास लावून दिसला. सचिनने आरडाओरड करून बाजूलाच राहणारे काका आणि इतरांना बोलविले. सर्वांनी मिळून राहुलला पडोळे हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करून राहुलला मृत घोषित केले.
परिसरात शोककळा
राहुल मनमिळावू स्वभावाचा होता. त्यामुळे परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. आई आशाताई (वय ४७) या गृहिणी असून, बहिणीचे लग्न झाले आहे. लहान भाऊ नीलेश (वय २२) इंटरनेट कॅफे संचलित करतो. राहुलच्या आत्महत्येची वार्ता कळताच अनेकांनी पडोळे हॉस्पिटलकडे धाव घेतली. माहिती कळताच प्रतापनगर पोलिसही पोहोचले. पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, राहुलच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.
---