शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कार्यालयापुढे युवक काँग्रेसचे धरणे

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

फोटो ओळी....सिव्हिल लाईन येथील मनपा कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापौरांना निवेदन : इंदिरा गांधी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची मागणीनागपूर : महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा अनागोंदी कारभार व असुविधाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी युवानेते मंगेश कामोने यांच्या नेतृत्वात शुक्र वारी ...


फोटो ओळी....सिव्हिल लाईन येथील मनपा कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते
महापौरांना निवेदन : इंदिरा गांधी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
नागपूर : महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा अनागोंदी कारभार व असुविधाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी युवानेते मंगेश कामोने यांच्या नेतृत्वात शुक्र वारी मनपा कार्यालयापुढे धरणे दिले. यावेळी महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उपकरणांचा अभाव आहे. डॉक्टर व परिचारिका उपस्थित नसतात. स्वच्छतेचा अभाव असून घाणीचे साम्राज्य आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. गरीब रुग्णांना उपचार मिळत नाही . याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
आंदोलनात विनायक इंगोले, वैभव काळे, विशाल वाघमारे, सुबोध सवाईथूल, विकास सेलोकर, रणजित बोराडे, नितीन कुमरे, समीर यादव, दुर्गेश मसराम, प्रकाश दुबे, संकेत कांबळे, समीर मेश्राम, विक्की तायडे, आकाश तायवाडे, रमेश काळे, सुगराम भंडारी आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)