शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आपचा लोकपाल नव्हे ‘महाजोकपाल’

By admin | Updated: November 29, 2015 03:02 IST

आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि नामांकित अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी दिल्ली सरकारचा लोकपाल म्हणजे ‘महाजोकपाल’ असल्याची टीका करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि नामांकित अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी दिल्ली सरकारचा लोकपाल म्हणजे ‘महाजोकपाल’ असल्याची टीका करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर आपनेही त्यांना प्रत्युत्तर देत भाजपसाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला.भूषण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिल्ली लोकपाल विधेयक बघून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान जनलोकपाल विधेयकाचा जो आराखडा तयार करण्यात आला होता त्यातील अनेक तरतुदी कमकुवत करण्यात आल्या आहेत. एकाअर्थी दिल्ली लोकपाल विधेयकात जनलोकपाल विधेयकातील सर्व सिद्धांतांवर पाणी फेरण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. केजरीवाल मंत्रिमंडळाने अलीकडेच लोकपाल विधेयकाला मंजुरी दिली असून सोमवारी हे विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडले जाण्याची शक्यता आहे. जनलोकपाल विधेयकाचा आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे भूषण म्हणाले की, दिल्ली सरकारच्या विधेयकात लोकपाल नियुक्ती आणि हटविण्याचे सर्वाधिकार सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे हा लोकपाल केवळ एक ‘महाजोकपाल’असेल. केजरीवाल यांनी हा देश आणि दिल्लीच्या जनतेसोबत फार मोठा विश्वासघात केला असून त्याची तोड नाही, असा वाग्बाणही भूषण यांनी डागला. (लोकमत न्यूज नेटवर्क)त्यांचे वडील आणि आपचे संस्थापक शांती भूषण यांनीसुद्धा या विधेयकाचे खरे नाव ‘केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपविणारे विधेयक’ असे असले पाहिजे अशी टीका केली.1) आपचे नेते राघव चड्डा यांनी भूषण यांचे सर्व आरोप फेटाळताना दिल्ली निवडणुकीपूर्वी भूषण कुटुंबाने जाहीरपणे आपच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते असा उलटवार केला.2) ही प्रशांत भूषण यांची नाही तर भाजपची पत्रपरिषद होती, असा टोलाही त्यांनी लगावला. चड्डा म्हणाले, भूषण यांचे अरुण जेटलींसोबतचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजप त्यांची निष्ठा पडताळत असून निकट काळात त्यांना यासाठी पुरस्कृत करण्यात आल्यास आश्चर्याचे कारण नाही.3) आंदोलनाच्या वेळी तयार करण्यात आलेलेच हे जनलोकपाल विधेयक असल्याचा दावाही त्यांनी केला. भूषण पक्षासोबत असताना त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मग आता हा विरोध का? असा सवाल आप नेत्याने केला. आपचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनीसुद्धा भूषण यांचे आरोप नाकारले.