कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:37 AM2021-06-17T09:37:33+5:302021-06-17T09:48:30+5:30

Corona Virus And Jobs : अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

youngest and oldest employees lost jobs in second wave of Covid 19 | कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नोकरी गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे तरुण आहेत किंवा अगदी जुने कर्मचारी आहेत. फॉर्च्यून 500 लिस्टच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतात एप्रिल 2021 दरम्यान 2000 लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. 

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएस (FIS) द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी स्थायी स्वरुपात गेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 4 टक्के होता. तर 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रेशर्समध्ये 11 टक्के लोकांनी स्थायी स्वरुपात नोकरी गमावली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 10 टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMII) ने मेमध्ये असे म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये 1 कोटीपेक्षी अधिक भारतीयांनी नोकरी गमावली आहे. बेरोजगारी दर 12 महिन्यातील सर्वोच्च आहे. हा दर 12 टक्के एवढा झाला आहे.

सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत काही वयोगटातील व्यक्तींनी यावर्षी सर्वाधिक नोकऱ्या गमावल्या आहेत. या दरम्यान 18 ते 24 वयोगटातील 9 टक्के कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरुपात  कामावरुन कमी करण्यात आले आहे. गेल्यावर्षी या वयोगटात अस्थायी स्वरुपात नोकरी जाण्याचं प्रमाण 21 टक्के होतं. तर 55 पेक्षा अधिक वय असणाऱ्या 7 टक्के लोकांची नोकरी अस्थायी स्वरुपात गेली आहे, गेल्यावर्षी हा आकडा 13 टक्के होता. कंपनीने अशी माहिती दिली आहे की 18 ते 24 वयोगटातील 38 टक्के तरुणांनी असे म्हटले आहे की त्यांनी 12 महिन्यात फसवणूक अनुभवली आहे. तर 25 ते 29 वयोगटाील 41 टक्के कर्मचाऱ्यांनी फसवणुकीचा सामना केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल 1 कोटी रोजगार बुडाले

उद्योग आणि रोजगार क्षेत्रालाही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे. एका अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल 1 कोटी रोजगार बुडाले असून, सुमारे 97 टक्के कुटुंबांची मिळकत घटली, असे सांगण्यात आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ्याच राज्यांनी कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादले असून, याचा परिणाम अर्थचक्रावर झाल्याचे सांगितले जात आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: youngest and oldest employees lost jobs in second wave of Covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app