मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:43 IST2025-10-30T18:40:29+5:302025-10-30T18:43:01+5:30

I Love Muhammad controversy: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये चार मंदिरांच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली. हे चौघेही हिंदू आहेत. 

'Young Hindus writing 'I Love Mohammed' on temple walls', police arrest them; names revealed | मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

I Love Muhammad news: उत्तर प्रदेशातील अलिगढमधील लोढा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या चार हिंदू मंदिरावर पेंट स्प्रेने आय लव्ह मोहम्मद असे लिहिण्यात आले होते. २५ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. तणाव निर्माण कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) अटक केली आहे. आय लव्ह मोहम्मद लिहिणारे चारही तरुण हिंदू असून, त्यांनी जमिनीच्या वादातून हे केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लोढा परसिरात २५ ऑक्टोबर चार हिंदू मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद असे पेंट स्पेने लिहिण्यात आले होते. याचे शहरात पडसाद उमटले. तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची चक्रे फिरवली. त्यात दोन गटातील जमीन वादातून हे कृत्य करण्यात आले असल्याचे तपासातून समोर आले. 

आरोपींची नावे काय?

अलिगढचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार जादौन यांनी सांगितले की, "दोन गटात जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यातून विरोधी गटाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने हे केले गेले. एका गटातील दिलीप, आकाश आणि अभिषेक यांनी आय लव्ह मोहम्मद लिहिण्याचा कट रचला होता. यातील राहुल नावाचा तरुण फरार आहे. 

पोलिसांनी सुरूवातीला मौलवी मुस्तकीम, गुल मोहम्मद, सुलेमान, सोनू, अल्लाबक्श, हसन, हामिद, युसूफ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी जीशांत सिंह, आकाश सारस्वत, दिलीप शर्मा आणि अभिषेक सारस्वत यांना अटक केली आहे. 

 कुणाला अडकवण्याचा प्रयत्न?

दिलीप, आकाश आणि अभिषेक यांनी जाणीवपूर्वक मंदिरांच्या भिंतीवर तेढ निर्माण होईल, असे लिहिले. दोन वेगवेगळ्या धर्मातील गटांमध्ये तणाव निर्माण व्हावा हाच उद्देश आरोपींचा होता. दुसऱ्या गटातील व्यक्ती विशिष्ट धर्मातील असल्याने त्यांनी हे केले.

Web Title : मंदिरों पर 'आई लव मोहम्मद' लिखने वाले हिंदू गिरफ्तार, अलीगढ़ मामला

Web Summary : अलीगढ़ में जमीन विवाद में फंसाने के लिए हिंदुओं ने मंदिरों पर 'आई लव मोहम्मद' लिखा। पुलिस ने पहले मुसलमानों पर मामला दर्ज किया। पुलिस ने कहा कि इस कृत्य का उद्देश्य धार्मिक तनाव भड़काना था।

Web Title : Hindus Wrote 'I Love Muhammad' on Temples, Arrested in Aligarh

Web Summary : In Aligarh, Hindus were arrested for writing 'I Love Muhammad' on temple walls to frame rivals in a land dispute. Police initially booked Muslims. The act aimed to incite religious tension, police said.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.