तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:32 IST2026-01-05T19:31:51+5:302026-01-05T19:32:27+5:30
Supreme Court News: केरळमधील सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देवास्वोम बोर्डाचे माजी सदस्य के. पी. शंकर दास यांना मोठा धक्का दिला आहे.

तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
केरळमधील सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देवास्वोम बोर्डाचे माजी सदस्य के. पी. शंकर दास यांना मोठा धक्का दिला आहे. केरळ हायकोर्टाच्या आदेशामधून आपल्याविरोधात ओढण्यात आलेले ताशेरे हटवण्यात यावेत, अशी मागणी करत शंकर दास यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तुम्ही तर देवालाही सोडलं नाही, अशा परखड शब्दात न्यायमूर्ती दीपांकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्यांना सुनावले.
या प्रकरणी सुनावणी करताना देवास्वोम बोर्डाचे सदस्य या नात्याने शंकरदास यांची या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी बनते, त्यामुळे ते चोरीच्या प्रकरणात आपली भूमिका नाकारू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
केरळ उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये शंकर दास यांचं वय आणि आरोग्याचा विचार करून काहीशी शिथिलता बाळगली होती, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पण्या योग्य असल्याचे सांगून त्यांना हटवण्यास नकार दिला.