"तुला खूप  सुंदर बायको मिळालीय’’, लोकांच्या सततच्या चिडवण्यामुळे पती वैतागला, छपरावरून उडी मारायला गेला, मग...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:13 IST2025-05-30T14:12:56+5:302025-05-30T14:13:23+5:30

Uttar Pradesh News: समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांवरून त्याच्यावर टीकाटिप्पणी करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या लोकांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशी मंडळी काही ना काही कारणं काढून एखाद्या व्यक्तीचं जिणं असह्य करून टाकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

"You have got a very beautiful wife," the husband got fed up with the constant teasing from people, went to jump off the roof, then... | "तुला खूप  सुंदर बायको मिळालीय’’, लोकांच्या सततच्या चिडवण्यामुळे पती वैतागला, छपरावरून उडी मारायला गेला, मग...  

"तुला खूप  सुंदर बायको मिळालीय’’, लोकांच्या सततच्या चिडवण्यामुळे पती वैतागला, छपरावरून उडी मारायला गेला, मग...  

समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांवरून त्याच्यावर टीकाटिप्पणी करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या लोकांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशी मंडळी काही ना काही कारणं काढून एखाद्या व्यक्तीचं जिणं असह्य करून टाकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका तरुणाला त्याच्या पत्नीच्या सुंदरतेवरून लोकांनी एवढं चिडवलं की तो पुरता वैतागून गेला. सततच्या चिडवण्यामुळे तो एवढा वैतागला की त्याने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील दुर्घटना टळली.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण छप्पराच्या कडेला जाऊन बसलेला दिसत आहे. तसेच खाली उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर खाली उभे असलेले पोलीस आणि काही लोक त्याला टोकाचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करताना दिसत आहेत. 

यादरम्यान, तिथे बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झालेली दिसत आहे. शेवटी पोलीस आणि आणखी एक व्यक्ती या तरुणाची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात. तसेच नंतर तो तरुण सुखरूपपणे खाली उतरतो. मात्र या घटनेमुळे समाजात घडणाऱ्या अशा गोष्टीबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.  

Web Title: "You have got a very beautiful wife," the husband got fed up with the constant teasing from people, went to jump off the roof, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.