शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुम्ही देश सोडून जा; सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संतापले, सुनावणीत Whatsapp ला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:56 IST

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जयमाला बागची, न्या. विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटलं की, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात अंतिम आदेश पारित केले जातील

नवी दिल्ली - कुठलीही कंपनी डेटा शेअरिंगच्या नावाखाली देशातील जनतेच्या खासगी अधिकाराशी खेळू शकत नाही. जर भारतातील नियम तुम्हाला पाळायचे नसतील तर तुम्ही देश सोडून जा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने WhatsApp आणि मेटाला फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ज्यात मेटा आणि व्हॉट्सअप यांनी कॉम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्यात त्यांच्यावर २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जयमाला बागची, न्या. विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटलं की, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात अंतिम आदेश पारित केले जातील. भारतातील नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार काटेकोरपणे संरक्षित केला जातो. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी गोपनीयता धोरणे इतक्या हुशारीने तयार केली आहेत की सामान्य नागरिक त्यांना समजू शकणार नाहीत, ज्यामुळे या कंपन्या त्यांचा डेटा चोरत राहू शकतील. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना ज्या ग्राहकांशी त्यांनी करार केले आहेत त्यांचा डेटा शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केले आहे.

ऑप्ट आऊटचा पर्याय कुठे आहे?

सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सअप आणि मेटाने दाखल केलेल्या याचिकांमध्ये पक्षकार बनवले आणि ९ फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश जारी करणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने विचारले की, ऑप्ट आऊटचा पर्याय कुठे आहे?. जर ग्राहकांना त्यांचा डेटा शेअर करायचा नसेल तर त्यांना बाहेर पडण्याचा पर्याय असावा. तंत्रज्ञान कंपन्यांना अशा प्रकारे डेटा शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यावर प्लॅटफॉर्मच्या धोरणातून बाहेर पडण्याचा पर्याय आहे असं व्हॉट्सअपची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अखिल सिब्बल यांनी सांगितले.  काय आहे संपूर्ण प्रकरण?

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) नोव्हेंबर २०२४ मध्ये एक आदेश पारित केला. व्हॉट्सअॅपच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणाची तपासणी करण्यात आली आणि त्यात मान्य असेल तर ठीक अन्य सोडून द्या असं धोरण ग्राहकांवर लादण्यात आले हे आढळले. ग्राहकांना बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला नाही. ही स्पर्धा कायदा २००२ चे उल्लंघन करते. या आधारावर कंपनीला ₹२१३.१४ कोटी दंड ठोठावण्यात आला होता. त्याला सुप्रीम कोर्टात कंपनीने आव्हान दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leave India if you disobey rules: Supreme Court slams WhatsApp.

Web Summary : Supreme Court rebuked WhatsApp and Meta, stating they cannot compromise user privacy for data sharing. The court emphasized that citizens' data privacy must be protected and questioned the absence of an opt-out option. CCI had fined WhatsApp ₹213.14 crore for its 2021 privacy policy.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMetaमेटा